Government Schemes

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रूपयांवरून 5 लाख रूपये आणि उपचारासाठी दोन लाख एवढे करण्याचा निर्णय 28 जून, 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. तसेच या योजनेमध्ये नवीन 200 दवाखान्याची निर्मिती केली जाणार आहे. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांवर योग्य उपचार व्हावेत हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.

Updated on 03 November, 2023 3:38 PM IST

या योजनेअंतर्गत पात्रता -
पिवळे व केशरी कार्ड धारक असले पाहिजे
1 लाखापेक्षा उत्पन्न कमी पाहिजे
दोन पेक्षा जास्त अपत्य नसायला पाहिजे

महत्वाची कागदपत्रे -
आधार कार्ड
राशन कार्ड
वयाचा दाखला
ओळखपत्र
पासपोर्ट साईज फोटो तीन.
आरोग्य कार्ड.
बँकेचे पासबुक.
सरकारी डॉक्टर द्वारे निदान केलेले प्रमाणपत्र .

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत किडनी प्रत्यारोपणासाठी तीन लाख रुपये आणि प्रत्येक कुटुंबाला उपचारासाठी दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच प्लास्टिक सर्जरी, हृदयविकार, मोतीबिंदू, कर्करोग, गुडघा हिप प्रत्यारोपण, डेंग्यू स्वाइन फ्लू, आणि अनेमियासारख्या 971 आजारांचा समावेश होता. तो वाढवून 1024 हजारावर उपचार केला जाईल. या योजनेमध्ये पहिल्यापेक्षा पेक्षा जास्त आजारावर उपचार केला जाईल. यामुळे गरीब जनतेला या योजनेच्या खूप मोठा आधार मिळेल. या योजनेबद्दल अधिक माहिती https://www.jeevandayee.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

ऑनलाइन अर्ज कसा करावा-
या योजनेतील ऑनलाइन अर्जासाठी, या योजनेच्या https://www.jeevandayee.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
लिंकवर क्लिक केल्यानंतर या वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर उघडेल
या होम पेजवर तुम्हाला New Registration चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा
यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन फॉर्म उघडेल
यामध्ये रूग्णा संबंधित सर्व माहिती लागेल आणि सर्व प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे
सबमिट वर क्लिक केल्यानंतर नोंदणी पूर्ण होईल, त्यानंतर कोणत्याही सरकारी रुग्णालयात उपचार घेता येवू शकतो.

लॉग इन करण्याची प्रक्रिया -
सर्वप्रथम महात्मा जोतोबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे
होम पेजवर लॉगिन पर्यायावर क्लिक करावे
यानंतर, समोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये रूग्णाचा यूजर-आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल
त्यानंतर login च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.अशा प्रकारे तुम्ही पोर्टलवर लॉगिन करू शकाल.

English Summary: Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana Know the benefits
Published on: 03 November 2023, 03:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)