एलआयसी ही विमा क्षेत्रातील विश्वासू कंपनी असून भारतीयांचा विश्वास संपादन केलेली कंपनी आहे. एलआयसी कायमच गुंतवणूकदारांसाठी चांगली गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देते. जर आपण एलआयसीच्या योजनांचा विचार केला तर प्रत्येक योजनेचा कालावधी व परताव्याचे स्वरूप आणि विम्याचे कव्हर त्याचे स्वरूप भिन्न आहे. या लेखामध्ये आपण एक महत्त्वपूर्ण प्लॅन विषयी माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:LIC Scheme: सरकारच्या 'या' योजनेत फक्त 240 रुपये गुंतवा; मिळणार 50 लाखांचा नफा
एलआयसीची जीवन लाभ पॉलिसी
एलआयसीची एक महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून ग्राहकाला दोन प्रकारचे फायदे दिले जातात. एक म्हणजे बोनसच्या माध्यमातून मिळणारा फायदा हा खूप महत्त्वाचा असून या पॉलिसीमध्ये पहिला बोनस हा पाहिला पुनरावृत्ती बोनस म्हणून दिला जातो.
तर शेवटचा बोनस अतिरिक्त बोनस म्हणून दिला जातो. या पॉलिसीमध्ये प्रतिमाह 794 रुपयांचा प्रीमियम भरून विमाधारकाला या पॉलिसीचा परिपक्वता कालावधी पूर्ण होण्याअगोदरच पाच लाख 25 हजार रुपयांचा फायदा मिळतो. एवढेच नाही तर ग्राहकाला यादरम्यान विमा संरक्षणाचे कवच देखील दिले जाते.
अगदी तुमच्या घरात आठ वर्षाचे मूल असेल त्याला सुद्धा या योजनेचा फायदा घेता येतो. वयाच्या 50 वर्षापर्यंत या योजनेत सहभागी होण्याची संधी मिळते. तुम्ही जर की पॉलिसी घेतलेली असेल आणि तुम्हाला पैशांची गरज पडली तर तुम्हाला या पॉलिसीवर कर्ज देखील उपलब्ध केले जाते.
नक्की वाचा:LIC च्या या प्लॅनमध्ये तुम्ही 861 रुपये गुंतवल्यास तुम्हाला मिळतील 540000 रुपये
या पॉलिसीचे वैशिष्ट्ये
1- यामध्ये कमीत कमी विमा रक्कम दोन लाख रुपयांची तर जास्तीत जास्त विमा रकमेच्या कुठलीही मर्यादा या योजनेत नाही. ही एक मर्यादित प्रिमियम पॉलिसी आहे.
2- या पॉलिसीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या पॉलिसीमध्ये तुम्हाला ठराविक कालावधी पेक्षा कमी कालावधीसाठी पैसे भरावे लागतात.
उदाहरणच द्यायचे झाले तर समजा तुम्ही पंधरा वर्षाचा प्लान निवडला तर दहा वर्षे पैसे भरावे लागतात आणि एकवीस वर्षाच्या प्लानसाठी पंधरा वर्षे पैसे भरावे लागतात. जर तुम्ही या योजनेत प्रतिमा 794 रुपयांचा प्रिमियम भरला तर वर्षाकाठी विमाधारकाला 9340 रुपयांचा हप्ता जमा करता येतो.
यामध्ये ग्राहकाला मिळणारे फायदे
या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर विम्याचे दोन लाख रुपये मिळतातच परंतु पुनरावृत्ती बोनसचा फायदा देखील मिळतो. तसेच त्यासाठी दोन लाख 35 हजार रुपये आणि अतिरिक्त बोनसच्या 90 हजार रुपये मिळतात.
ही सगळी रक्कम एकत्र केली तर एकूण परिपक्वता रक्कम पाच लाख 25 हजार रुपये मिळतात. याचा अर्थ एक लाख 49 हजार 45 रुपये जमा करून पाच लाख 25 हजार रुपये मिळवता येतात.
नक्की वाचा:एलआयसीने लॉन्च केली नवीन पॉलिसी योजना; आयुष्यभर पेन्शनचा मिळणार 'इतका' लाभ
Published on: 08 September 2022, 12:04 IST