Government Schemes

ग्राहकांनो जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक आणि चांगले भविष्य हवे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. एलआयसीच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये तुम्ही सुरक्षित गुंतवणूक करून चांगला परतावा घेऊ शकता.

Updated on 13 September, 2022 9:41 AM IST

ग्राहकांनो जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक आणि चांगले भविष्य हवे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. एलआयसीच्या (LIC) अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये तुम्ही सुरक्षित गुंतवणूक करून चांगला परतावा घेऊ शकता.

अधिक नफा हवा असेल तर LIC ची ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज आम्ही ज्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत त्यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर पूर्ण 28 लाख रुपये मिळतील. या योजनेचे नाव आहे जीवन प्रगती योजना.

या पॉलिसीमध्ये दररोज 200 रुपये जमा करावे लागतील. या पॉलिसीमध्ये (policy) गुंतवणूकदारांना दररोज 200 रुपये म्हणजेच एका महिन्यात 6000 रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही त्यात 20 वर्षांसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला एलआयसीकडून मॅच्युरिटीवर पूर्ण 28 लाख मिळतील. याशिवाय यामध्ये तुम्हाला रिस्क कव्हरही मिळेल.

शेतकरी मित्रांनो कापसावरील अळीचा 'असा' करा कायमचा नायनाट; मिळेल भरघोस उत्पन्न

या योजनेची वैशिष्ट्ये

1) जीवन प्रगती योजनेत (jeevan pragati yojana) नियमित प्रीमियम भरावा लागतो.
2) या पॉलिसीमध्ये, तुम्हाला लाइफ कव्हर म्हणजेच डेथ बेनिफिट देखील मिळतो जो दर 5 वर्षांनी वाढतो.
3) या पॉलिसीची मुदत किमान 12 वर्षे आणि कमाल 20 वर्षे आहे.
4) पॉलिसीचे कमाल गुंतवणुकीचे वय ४५ वर्षे आहे. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.
5) ही योजना नॉन-लिंक्ड, बचत आणि संरक्षणाचा लाभ देते.
6) या योजनेमध्ये तुम्हाला वार्षिक, त्रैमासिक आणि सहामाही आधारावर प्रीमियम भरावा लागेल.

शेतकऱ्यांना करोडपती बनवणार काळ्या पेरूची शेती; जाणून घ्या सविस्तर

नॉमिनीला पैसे दिले जातात

पॉलिसीच्या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, पॉलिसीचे पैसे (policy money) त्याच्या/तिच्या नॉमिनीला दिले जातात. LIC जीवन प्रगती योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूकदारांचे जोखीम कव्हर दर 5 वर्षांनी वाढतो. म्हणजेच तुम्हाला मिळणारी रक्कम ५ वर्षात वाढत असते. ही योजना गुंतवणूक दारांसाठी महत्वाची ठरू शकते.

महत्वाच्या बातम्या 
आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान ठरण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सोयाबीनच्या दरात सुधारणा; मिळतोय 'इतका' दर
नितीन गडकरींनी शेतकऱ्यांना दिला मोलाचा सल्ला; म्हणाले...

English Summary: LIC's Jeevan Pragati Yojana 28 lakhs after maturity
Published on: 13 September 2022, 09:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)