Government Schemes

एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून ग्राहकांना चांगला परतावा मिळतो. ज्यांना छोट्या रक्कमेपासून गुंतवणूक करायची आहे. अशा ग्राहकांसाठी एलआयसीच्या योजना उपयोगी पडतात. यासह रक्कम सुरक्षित देखील राहते.

Updated on 16 October, 2022 3:58 PM IST

एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून ग्राहकांना चांगला परतावा मिळतो. ज्यांना छोट्या रक्कमेपासून गुंतवणूक करायची आहे. अशा ग्राहकांसाठी एलआयसीच्या योजना उपयोगी पडतात. यासह रक्कम सुरक्षित देखील राहते.

भविष्य सुरक्षित राहण्यासाठी आतापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली पाहिजे. आज आपण एलआयसीच्या एका अतिशय चांगल्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. एलआयसीच्या 'या' योजनेचे नाव सरल पेन्शन योजना आहे.

या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा 12 हजार रुपये पेन्शन मिळवू शकता. ही योजना तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी काम करेल. वृद्धापकाळात तुम्हाला इतर कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नाही.

गांजाची नशा किती वेळ राहते? संशोधनात महत्वाची माहिती आली समोर, जाणून घ्या

एलआयसी सरल पेन्शन योजना ही एकच प्रीमियम योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला मुदत ठेवीप्रमाणे लाभ मिळतो. या योजनेत फक्त 40 ते 80 वयोगटातील लोकच गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.

झुम शेतीमधून शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; जाणून घ्या 'या' पद्धतीविषयी

तुम्ही वयाच्या 42 व्या वर्षी LIC सरल पेन्शन प्लॅनमध्ये 30 लाख रुपयांची वार्षिकी खरेदी केल्यास. अशा परिस्थितीत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 12,388 रुपये पेन्शन मिळेल. जवळपास 15 हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळणार आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कर्जाची सुविधाही मिळते. एलआयसी सरल पेन्शन प्लॅनमध्ये, तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर पेन्शन लाभ मिळतो. 

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान तीन टप्प्यात मिळणार; जाणून घ्या वाटप प्रक्रिया
सरकारची मोठी घोषणा; साखरेसाठी प्रतिकिलो फक्त 20 रुपये मोजावे लागणार
दिलासादायक! गुग्गुळ औषधी वनस्पती लागवडीसाठी सरकार देतंय एकरी 48 हजार रुपयांचे अनुदान

English Summary: LIC very special 15 thousand month one investment
Published on: 16 October 2022, 03:47 IST