गुंतवणुकीच्या बाबतीत केलेल्या गुंतवणुकीचे सुरक्षितता आणि त्या माध्यमातून मिळणारा परतावा किंवा फायदे हे खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे प्रत्येक जण स्वतःचे कष्टाचे पैसे गुंतवताना या गोष्टींचा प्रकर्षाने विचार करतात. जर आपण गुंतवणूक पर्यायांचा विचार केला तर बरेचजण शेअर्स मार्केट आणि म्युचअल फंड तसेच एलआयसी किंवा बँकाच्या मुदतठेव योजनांचा लाभ घेतात
परंतु यामध्ये आपण लाइफ कार्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसीचा विचार केला तर गुंतवणुकीच्या बाबतीत सगळ्यात विश्वासाची अशी एक वित्तीय संस्था असून एलआयसीच्या माध्यमातून अनेक आकर्षक विमा गुंतवणूक योजना ग्राहकांसाठी ऑफर केल्या जातात. अशीच एक एलआयसीच्या महत्त्वपूर्ण योजनेची या लेखात माहिती घेणार आहोत.
एलआयसीची जीवन लाभ योजना
एलआयसीची महत्त्वपूर्ण योजना असून एक नॉन लींक्ड पॉलिसी आहे म्हणजे ज्याचा शेअर बाजाराचा घसरणीचा किंवा तेजीचा या योजनेवर आणि तुम्ही गुंतवलेल्या पैशावर कोणताही परिणाम होणार नाही. एक लिमिटेड प्रेमियम योजना असून मुलांचे लग्न, त्यांचे शिक्षण व इतर मालमत्तेची खरेदी लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे.
या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य
या योजनेमध्ये कमीत कमी आठ ते जास्तीत जास्त 59 वर्षे वय असलेले व्यक्ती ही पॉलिसी सहजपणे घेऊ शकतात.ही पॉलिसी सोळा ते पंचवीस वर्षे मुदतीत घेता येऊ शकते.
यामध्ये कमीत कमी दोन लाख रुपयांचा विमा रक्कम घ्यावी लागते व जास्तीची कुठलीही मर्यादा नाही. तसेच तुम्ही एकदाची पॉलिसी सुरू केल्यानंतर तीन वर्ष यात पैसे भरल्यानंतर तुम्हाला यावर कर्जाची सुविधा देखील मिळते. तसेच प्रीमियमवर करात सूट मिळते तसेच पॉलिसीधारकाला मृत्यू झाला तर संबंधित नॉमिनीला विम्याची रक्कम आणि बोनसचे देखील फायदे दिले जातात.
यामध्ये जर पॉलिसीधारकाला मृत्यू पॉलिसीच्या मुदतीतच झाला आणि त्याने मृत्यूपर्यंत सर्व प्रिमियम भरले असतील तर त्याच्या नावाने नॉमिनीला मृत्यू लाभ म्हणून मृत्यूनंतर मिळणारी रक्कम, फायनल एडिशन बोनस देखील दिला जातो. या योजनेमध्ये तुम्ही तर दर महिन्याला 233 रुपये जमा केले तर तुम्ही सतरा लाखांपर्यंतचा फंड मिळवू शकता.
नक्की वाचा:LIC च्या जीवन शिरोमणी योजनेत फक्त 4 वर्ष गुंतवणूक करा आणि मिळवा 1 कोटी रुपयांचा लाभ
Published on: 05 October 2022, 04:12 IST