Government Schemes

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नेहमीच शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबविण्यात येतात. अशीच एक महत्वाची योजना म्हणजे शेतीसाठी तार कुंपण योजना. डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतामध्ये तार कुंपन करून त्यांच्या शेताचे व शेतातील मालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करू शकतात.

Updated on 09 October, 2023 3:42 PM IST

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नेहमीच शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबविण्यात येतात. अशीच एक महत्वाची योजना म्हणजे शेतीसाठी तार कुंपण योजना. डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतामध्ये तार कुंपन करून त्यांच्या शेताचे व शेतातील मालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टळता येऊ शकते. या योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने 90% अनुदान दिले जाते.
तार कुंपन योजनेचा अर्ज कोठे करायचा-
तार कुंपण योजना 2023 या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अर्ज पंचायत समितीमध्ये करायचा आहे.
विहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित संवर्ग व पंचायत समितीकडे सादर करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
सातबारा उतारा
गाव नमुना ८ अ
जात प्रमाणपत्र
शेतकऱ्याचे आधार कार्ड
एकापेक्षा जास्त शेत मालक असल्यास अर्जदाराला प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र
ग्रामपंचायतीचा दाखला
समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

लाभाचे स्वरूप-
हे अनुदान चार विभागांमध्ये दिले जाते
एक ते दोन हेक्टर क्षेत्रासाठी 90 टक्के अनुदान
दोन ते तीन हेक्टर क्षेत्रासाठी 60 टक्के अनुदान
तीन ते पाच हेक्टर क्षेत्रासाठी 50 टक्के अनुदान
पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते.
या योजनेअंतर्गत साधारणतः दोन क्विंटल काटेरी तार आणि 30 नग खांब 90 टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. तर उर्वरित 10 टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते. तसेच खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तर यासाठी लाभार्थ्यांना साधारणतः 200 किलो काटेरी तार व 30 नग खांब 75 टक्के अनुदानावर दिले जाणार आहेत. उर्वरित 25 टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना भरायचे आहे.या योजनेचा अर्ज कृषी विभाग पंचायत समितीमध्ये करावा लागतो.

English Summary: Know Wire Fence Subsidy Scheme for Farmers Detailed Information
Published on: 09 October 2023, 03:42 IST