Government Schemes

शेतीसाठी हंगामाला म्हणजे पैशाची गरज भासतेच. बऱ्याच शेतकऱ्यांच्या हाताशी पैसा नसल्यामुळे हातउसने किंवा सावकारांच्या कडून व्याजाने पैसे घ्यायला लागतात.

Updated on 12 June, 2022 1:17 PM IST

शेतीसाठी हंगामाला म्हणजे पैशाची गरज भासतेच. बऱ्याच शेतकऱ्यांच्या हाताशी पैसा नसल्यामुळे हातउसने किंवा सावकारांच्या कडून व्याजाने पैसे घ्यायला लागतात.

यामध्ये अवाच्या सव्वा व्याज आकारून शेतकऱ्यांची लूट केली जाते. बऱ्याचदा वेळेवर पैसे उपलब्ध न झाल्याने शेतीला लागणारे आवश्यक गोष्टी वेळेवर होत नाही व त्याचा परिणाम थेट उत्पादनावर होण्याची दाट शक्यता असते.

त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातात पैसे असणे खूपच गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारने एक चांगला पर्याय दिला असूनकिसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुणाकडे हात न पसरवतात त्यांना शेता साठी लागणारा पैसा उपलब्ध होतो. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया आहे खूप सोपी असूनआता बरेच शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत.

अशा पी एम किसान सन्मान निधी लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळते.त्यामुळे शेतकरी बंधूंना शेतीसाठी लागणारा पैसा अगदी स्वस्त दरात कर्ज रूपाने उपलब्ध होतो.देशातील एकूण किसान क्रेडिट धारक शेतकऱ्यांचा विचार केला तर महाराष्ट्र तील शेतकऱ्यांचा चांगला सहभाग यामध्ये आहे.

केंद्र सरकारने देखील यासाठी प्रोत्साहन दिले असून फेब्रुवारी 2020 पासून याकरिता एक विशेष मोहीम देखील सुरू करण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत दोनच वर्षात 2 कोटी 92 हजार नवीन किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले.या लेखामध्ये आपण किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊ.

नक्की वाचा:सरकारी योजना:'या' योजनेच्या माध्यमातून मिळणार गाई, म्हशी आणि शेळ्या, जाणून घ्या राज्य सरकारच्या या योजनेबद्दल

 किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया

 जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या संकेतस्थळाच्या फार्मर्स कॉर्नर वर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला किसान क्रेडिट फॉर्म हा पर्याय दिसतो. तुम्हाला फक्त हा एक पानाचा फॉर्म डाउनलोड करावा लागतो आणि भरावा लागतो. यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड चे फोटो कॉपी अपलोड करावी लागते व अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचा फोटो अपलोड करावा लागणार आहे. तसेच तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र देखील आवश्यक असते.

त्यामध्ये तुम्ही इतर कोणत्याही बँकेकडून कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नाही  किंवा तुम्ही कुठल्याही बँकेचे थकबाकीदार नाहीत, असे त्यावर लिहिलेले असते. नंतर हा फॉर्म भरून तुम्ही जवळच्या बँकेत सबमिट करा. जर तुम्ही भरलेला अर्ज बरोबर असेल तर 14 दिवसांच्या आत किसान क्रेडिट कार्ड तयार केले जाते. तसेच किसान क्रेडिट कार्ड बनवण्याचा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही सी एस सी भारतात कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये देखील अर्ज करू शकतात.

नक्की वाचा:Pm Kisan: मोठी बातमी! पीएम किसानच्या -केवायसीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

English Summary: kisan credit card scheme is benificial for farmer get 3 lakh loan without morgage
Published on: 12 June 2022, 01:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)