Government Schemes

Jalyukta Shivar : जलयुक्त शिवार अभियानासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला अधिक निधी दिला जाईल. लातूर, भंडारा, सोलापूर, सांगली, पुणे या ५ जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा वेगाने प्रगती झाली आहे. इतर जिल्ह्यांनीही कामे अधिक वेगाने करावीत.

Updated on 25 January, 2024 11:15 AM IST

Galmukat Dharan Yojana : ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवून कामांना गती द्यावी, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान २.० चा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे ऑनलाईन प्रणाली द्वारे उपस्थित होते.

जो जिल्हा अधिक काम करेल त्याला अधिक निधी मिळणार

यावेळी फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला अधिक निधी दिला जाईल. लातूर, भंडारा, सोलापूर, सांगली, पुणे या ५ जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा वेगाने प्रगती झाली आहे. इतर जिल्ह्यांनीही कामे अधिक वेगाने करावीत. तसंच जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश लक्षात घेता, राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार अभियान २.०' चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. ज्यामध्ये पाणलोट विकास उपक्रमांच्या विविध कामांचा समावेश आहे, यामुळे पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत होऊन शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यास मदत होणार आहे.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांना फायदा

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेत धरणातील व गावतळ्यातील साठलेला गाळ काढून टाकून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याबरोबरच या गाळाचा वापर शेतशिवारामध्ये करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी फायदा होईल, ज्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होईल. या वर्षात आत्तापर्यंत ५६५ तलावातून सुमारे ८३.३९ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे, ज्यामुळे जवळपास ६ हजार लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा झाला आहे. या योजनेसाठी शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे तसेच इतर स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेत आहोत. त्यांना जिल्हा प्रशासनाने पूर्ण सहकार्य करावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

कृषी मंत्री मुंडे आणि मुथा यांनी जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानासाठी विविध सूचना केल्या. त्यांचीही कृषी व जलसंधारण विभागाने दखल घ्यावी असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांनी जलयुक्त शिवार अभियान २.० च्या कामांच्या प्रगतीचा अहवाल सादरीकरणाव्दारे सादर केला. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम,मृद व जलसंधारण आयुक्त प्रकाश खपले, कोकण विभागीय आयुक्त डॉ. ‌महेद्र कल्याणकर, मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे उपस्थित होते.

English Summary: Jalyukta Shivar Abhiyan Update Devendra Fadnavis important orders to the administration regarding Jalyukta Shivar Abhiyan
Published on: 25 January 2024, 11:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)