Government Schemes

पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत. ज्यामधून सर्वसामान्य लोकांना तसेच शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिसकडून अनेक प्रकारच्या सेव्हिंग स्कीम चालवल्या जातात.

Updated on 04 October, 2022 2:21 PM IST

पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत. ज्यामधून सर्वसामान्य लोकांना तसेच शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिसकडून अनेक प्रकारच्या सेव्हिंग स्कीम (Savings Scheme) चालवल्या जातात.

यामधीलच एक लोकप्रिय असलेल्या योजनेविषयी माहिती जाणून घेऊया. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर कुठल्याही प्रकारची जोखीम राहत नाही. दिलासादायक बातमी म्हणजे बऱ्याच दिवसांनंतर केंद्र सरकारने स्मॉल सेव्हिंगच्या काही योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे.

जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसची सेव्हिंग स्कीम (Post Savings Scheme ) तुमच्यासाठी उत्तम पर्यात ठरू शकते. केंद्र सरकारने दोन आणि तीन वर्षांसाठी टाइम डिपॉझिट स्कीम, सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम, किसान विकास पत्र आणि पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम सारख्या योजनांवर व्याजदर वाढवला आहे.

वृषभ, कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस मौज मजेचा; जाणून घ्या संपूर्ण राशींचे राशीभाविष्य

या योजनांवर व्याजदर वाढवला

या स्मॉल सेव्हिंग स्कीमवरील व्याजदरांमध्ये झालेली वाढ १ ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. पोस्ट ऑफीसच्या टाइम डिपॉझिटमध्ये आधी दोन वर्षांसाठी ५.५ टक्के व्याज दिलं जात होतं. आता यामध्ये २० बेसिस पॉईंटची वाढ केली गेली आहे. त्यानंतर व्याजदर ५.७ टक्के झाला आहे.

तर तीन वर्षांच्या टाइम डिपॉझिट स्कीमवर ३० बेसिस पॉईंट (basis point) व्याज वाढवण्यात आले आहे. त्याअंतर्गत आधी ५.५ टक्के दराने व्याज मिळत होते. आता हा दर ५.८ टक्के एवढा झाला आहे.

पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीमच्या व्याजदरामध्ये १० बेसिस पॉईंटने वाढ करण्यात आली आहे. आधी याअंतर्गत ६.६ टक्के दराने व्याज मिळत असे. आता या योजनेमध्ये ६.७ टक्के दराने व्याज मिळेल.

दिलासादायक! सौर पंपासाठी तब्बल १५ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर

किसान विकास पत्र स्कीमअंतर्गत १२४ महिन्यांसाठी ६.९ टक्के दराने व्याज दिले जात असे. केंद्र सरकारने आता या स्कीमवरसुद्धा व्याजदर वाढवले आहेत. आता या योजनेंतर्गत १२३ महिन्यांच्या मॅच्युरिटीवर ७ टक्के दराने व्याज मिळेल.

केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्येही (Senior Citizen Savings Scheme) व्याजदरांमध्ये २० बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. आधी या योजनेंतर्गत ७.४ टक्के व्याजाच्या दराने व्याज मिळत होते. आता ते वाढून ७.६ टक्के एवढे झाले आहे.

महत्वाच्या बातम्या 
सावधान! ही लक्षणे जाणवल्यास समजा तुमच्या फुप्फुसात पाणी भरलंय; जाणून घ्या सविस्तर
शेतकऱ्यांनो जनावरांच्या आरोग्यात लोहाचा समावेश करा; उत्पादनात होईल वाढ
सातारा जिल्ह्यात सोलर पॅनलवर चालणाऱ्या तब्बल 202 योजना मंजूर; शेतकऱ्यांना होणार फायदा

English Summary: investors Post Savings Scheme government big gift Dussehra benefits
Published on: 04 October 2022, 02:21 IST