Government Schemes

जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी भरपूर पैसे साठवायचे असतील तर मोदी सरकारच्या एका योजनेत आपण गुंतवणूक करून लाखों रुपयाची बचत करता येणार आहे. मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही मोदी सरकारची एक अशी योजना आहे ज्यात आपण गुंतवणूक करून आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी चांगला पैसा सेविंग करू शकणार आहात.

Updated on 10 July, 2022 7:49 PM IST

जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी भरपूर पैसे साठवायचे असतील तर मोदी सरकारच्या एका योजनेत आपण गुंतवणूक करून लाखों रुपयाची बचत करता येणार आहे. मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही मोदी सरकारची एक अशी योजना आहे ज्यात आपण गुंतवणूक करून आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी चांगला पैसा सेविंग करू शकणार आहात.

तुम्ही सुद्धा आपल्या मुलीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी पैसा वाचवायचा असेल तर ही योजना एक चांगला पर्याय आहे.  SSY योजनेत पैसे गुंतवून तुम्ही तुमच्या मुलीचे उच्च शिक्षण आणि लग्न पार करू शकणार आहात.

मित्रांनो तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी  पैसा उभारायचा असेल तर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करावी लागेल. या योजनेसाठी 10 वर्षांखालील मुलीचे खाते सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत उघडता येते.  SSY ही सरकारची मुलींसाठी असलेली अल्प बचत योजना आहे. बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे. लहान बचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना ही सर्वोत्तम व्याजदर योजना आहे.

SSY मध्ये खाते कसे उघडायचे

SSY अंतर्गत खाते मुलीच्या जन्मानंतर आणि 10 वर्षाच्या आत किमान 250 रुपये ठेवीसह उघडले जाऊ शकते. चालू आर्थिक वर्षात SSY अंतर्गत, वर्षाला जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपये जमा केले जाऊ शकतात. सध्या त्यावर 7.6 टक्के व्याज मिळत आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या दोन मुलींसाठी खाते उघडू शकता. वयाच्या 21 व्या वर्षी मुली या खात्यातून पैसे काढू शकतात. या योजनेत 9 वर्षे 4 महिन्यांत रक्कम दुप्पट होईल.

सुकन्या समृद्धी योजना खाते कोठे उघडले जाईल आणि हे खाते किती काळ सुरू राहील

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा व्यावसायिक शाखेच्या अधिकृत शाखेत उघडले जाऊ शकते. आणि सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यानंतर, मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत ते सुरू ठेवता येते.

मॅच्युरिटीवर 65 लाखाहून अधिक रुपये मिळतील

जर तुम्ही या योजनेत दरमहा 3000 रुपये म्हणजेच 100 रुपये प्रतिदिन गुंतवले तर 14 वर्षांनंतर तुम्हाला 7.6 टक्के वार्षिक चक्रवाढ दराने 36000 रुपयांवर 9,11,574 रुपये मिळतील.  21 वर्षांच्या म्हणजेच मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये असेल. जर तुम्ही दिवसाला 416 रुपये वाचवले तर तुम्ही तुमच्या मुलीसाठी 65 लाख रुपयांचा निधी तयार करू शकता.

English Summary: invest in this scheme and save 65 lakh
Published on: 10 July 2022, 07:49 IST