Government Schemes

देशात शेतकऱ्यांची लोकसंख्या मोठी असुन आजही देशातील करोडो शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत.अशा परिस्थितीत त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवत आहे. याशिवाय सरकारने अनेक लहान बचत योजनाही सुरू केल्या आहेत. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे ग्राम सुरक्षा योजना.

Updated on 08 October, 2023 6:00 PM IST

देशात शेतकऱ्यांची लोकसंख्या मोठी असुन आजही देशातील करोडो शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत.अशा परिस्थितीत त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवत आहे. याशिवाय सरकारने अनेक लहान बचत योजनाही सुरू केल्या आहेत. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे ग्राम सुरक्षा योजना. या योजनेत गुंतवणूक करून बंपर परतावा मिळू शकतो. देशभरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पोस्ट ऑफिसच्या या ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. जर दररोज 50 रुपये वाचवुन दर महिन्याला 1500 रुपये या योजनेत गुंतवले तर मॅच्युरिटीच्या वेळी 35 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो. तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया -

योजनेअंतर्गत किती परतावा मिळेल -
योजनेअंतर्गत, वयाची 80 वर्षे पूर्ण झाल्यावर पॉलिसीचे 35 लाख रुपये परतावा मिळेल. तसेच गरजेच्या वेळीही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढता येऊ शकतात. या योजनेअंतर्गत 55 वर्षांच्या गुंतवणुकीवर 31 लाख 60 हजार रुपये मिळतील. तर 58 वर्षांच्या गुंतवणुकीवर 33 लाख 40 हजार रुपये मिळतील आणि 60 वर्षांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला परिपक्वतेच्या वेळी 34 लाख 60 हजार रुपये मिळतील.

या योजनेसाठी पात्रता -
भारतातील कोणताही नागरिक ज्याचे वय 19 ते 35 वर्षे दरम्यान आहे, तो पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेत अर्ज करून गुंतवणूक सुरू करू शकतो.यामध्ये तुम्हाला 10 हजार रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची सुविधा मिळते. या योजनेंतर्गत, जर गुंतवणूकदाराचा वयाच्या 80 व्या वर्षी मृत्यू झाल्यास वारसाला बोनससह संपूर्ण रक्कम मिळते.

English Summary: Invest in Gram Suraksha Yojana and earn returns of up to Rs 35 lakh
Published on: 08 October 2023, 06:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)