Government Schemes

या योजनेतंर्गत मोसंबी ३ वर्ष वय झालेल्या पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पिक नुकसानीस(आर्थिक)खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

Updated on 16 October, 2023 1:20 PM IST

विनयकुमार आवटे

मोसंबी पिकासाठी ही योजना अधिसुचित वर्धा, बुलढ़ाणा,हिंगोली अकोला, नागपुर, अहमदनगर, अमरावती, धुळे, बीड, परभणी, पुणे, नांदेड, औरंगाबाद, जालना, जळगाव, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्हयामधील, अधिसुचित तालुक्यातील, अधिसुचित महसूल मंडळात लागू आहे. या जिल्ह्यात शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर संदर्भ हवामान केंद्र आकडेवारी वरुण नुकसान भरपाई अंतिम केली जाते.

या योजनेतंर्गत मोसंबी ३ वर्ष वय झालेल्या पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पिक नुकसानीस(आर्थिक)खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

योजनेत मोसंबी पिकासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक :- ३१ ऑक्टोबर २०२३
शेतकर्‍यांसाठी विमा हप्ता
हवामान धोके - विमा संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टर- शेतकर्‍यांसाठी विमा हप्ता रुपये प्रती हेक्टर
अवेळी पाऊस,जास्त तापमान ,जास्त पाऊस - ८०,००० - ४००० -ते ४४००
गारपीट- २६ ६६७- १३३४

योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा
जिल्हे - विमा कंपनीचे नांव व पत्ता
१) अहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापुर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार - रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
२) बीड, औरंगाबाद अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर - एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि
३) रायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद - भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड

शेतकर्‍यांचा योजनेतील सहभाग
१) या योजनेत अधिसुचित क्षेत्रात, अधिसुचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात. मात्र भाडेकरार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे .
२) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
३) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत विमा हप्ता जमा करुन सहभाग घेवू शकतात. त्यासाठी , आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पिक लागवड स्वयंघोषणा पत्र , फळबागेचा(Geo Tagging) केलेला फोटो , बँक पासबूक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल.कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

४) एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागु असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेवू शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसुल मंडळ अधिसुचित असणे आवश्यक आहे)
५) शेतकरी मृग किंवा अंबिया पैकी एका बहारात भाग घेऊ शकतो.
६) एक शेतकरी ४ हेक्टर च्या मर्यादेत विमा संरक्षण घेवू शकतो.
७) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ % च्या मर्यादेत असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून म्हणून देण्यात येतो. मात्र विमा हप्ता ३५% पेक्षा जास्त असल्यास शेतकर्‍याला ५% पेक्षा जास्त विमा हप्ता भरावा लागतो.
८) या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसुल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा.

लेखक - विनयकुमार आवटे, कृषी सहसंचालक (विस्तार व प्रशिक्षण), म.रा. पुणे -५
ई-मेल - avinaykumar.30@gmail.com

English Summary: Insurance plan applicable for Mosambi know detailed information
Published on: 16 October 2023, 01:20 IST