Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 13 ऑक्टोबर रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

Updated on 14 October, 2022 10:35 AM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना (farmers) आर्थिक दिलासा मिळतो. सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 13 ऑक्टोबर रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

9 जिल्ह्यांसाठी तब्बल 755 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या मदतीसाठी 8 लाख पेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत, या सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. कोणत्या 9 जिल्ह्यांना मदत देण्यात येणार आहे? याविषयी सविस्तर ,माहिती जाणून घेऊया.

या 9 जिल्ह्यांना मिळणार मदत

विशेष म्हणजे पीक विम्याच्या (crops insurance) निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना ही 755 कोटींची रक्कम देण्याचा निर्णय घेतल्यामुळे 8 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. माहितीनुसार औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ आणि सोलापूर हे 9 जिल्हे आहेत.

नाशिकमधील बनावट कीटकनाशकांचा 295 लिटरचा साठा जप्त

सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत

जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती (Department of Agriculture) पिकांचे खूप नुकसान झाले होते. ज्यासाठी राज्य सरकारकडून 3 लाख 501 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात मंजुरी देण्यात आली होती.

परंतु पात्र शेतकऱ्यांमध्ये केवळ तीच मंडळे किंवा शेतकरी (Farmers) पात्र करण्यात आली होती जी पीक विम्याच्या (Crop Insurance) निकषात बसत होते. ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्के नुकसान झाले आणि 65 मिलिमीटर इतका पाऊस झाला असेल.

या नियमात न बसणाऱ्या परंतु सततच्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या मदतीतून वगळण्यात आले होते. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.व यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.

LIC ची जबरदस्त योजना लाँच; गुंतवणुकीवर मिळणार 3 लाख रुपयांचा फायदा

755 कोटी 69 लाख 43 हजार रुपये 

सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे. 755 कोटी 69 लाख 43 हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये विभागणी केली असता जिरायती शेतीसाठी 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत, बागायती शेतीसाठी 27 हजार प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत तर बहु वार्षिक पिकांसाठी 36 हजार प्रती हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मदत देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 
वाटाणा, शेवग्याचे भाव तेजीत; जाणून घ्या बाजार समितीतील बाजारभाव
सिंह, कन्यासह या राशीच्या व्यक्तींनी सावध राहण्याची गरज; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
कौतुकास्पद! शेतकऱ्याने नवीन पद्धतीच्या वापराने १६ फूट ऊस वाढवला; घेतोय दुप्पट उत्पादन

English Summary: ineligible farmers crop insurance assistance 755 crores funds approved 9 districts
Published on: 14 October 2022, 10:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)