महिलांच्या सक्षमिकरणासाठी सरकारमार्फत नवनवीन योजना जाहीर केल्या जातात. स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण रोखण्यासाठी सरकारने पंतप्रधान मातृवंदना योजना २ या योजनेची घोषणा केली आहे. भारतात दर तीनपैकी एक महिला कुपोषित आहे. अशा मातांची मुले कुपोषणामुळे कमी वजनाची असतात. बाळाचे कुपोषण आईच्या पोटातच सुरू होते. एकूण जीवनचक्रावर याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक ताणतणावांकडे विशेष लक्ष दिल्यास प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेद्वारे कमी केले जाते. केंद्र सरकारमार्फत पहिल्या आपत्यासाठी ५ हजार रुपये दिले जातात. सार्वजनिक आरोग्य विभागाने पंतप्रधान मातृवंदना योजना या योजनेची घोषणा केली आहे. यानुसार महिलेला दुसरे आपत्य मुलगी झाल्यास ६ हजार रुपये दिले जाणार आहेत.अजुनही अनेक गावांत खेड्यापाड्यांमध्ये आणि शहरांमध्येही बऱ्याच ठिकाणी मुलगाच हवा अशी मागणी असते. यासाठी अवैधरित्या गर्भ तपासणी व गर्भपात देखील केला जातो. अशा अनेक दवाखाण्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कन्यारत्न प्राप्त झाल्यास मुलीच्या कुटुंबीयांना ६ हजारांची रोख रक्कम देण्यात येणार आहे.
कुणाला मिळेल लाभ -
आर्थिक उत्पन्नानुसार या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी महिला ज्या कुटुंबातील आहेत त्या कुटुंबाचे वार्षिक उत्तपन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे, अशी अट आहे. तसेच १८ ते ५५ वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ येता येणार आहे.
जुळी मुले झाली तर?-
एखाद्या महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या, किंवा जुळ्या मुलांमध्ये एक मुलगा आणि मुलगी झाली तरी देखील एका मुलीसाठीच या योजनेचा लाभ घेता योणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकता. योजनेची संपूर्ण माहितीही यावर तुम्हाला मिळेल.
योजनेची महिती-
योजना-प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
व्दारे सुरुवात- माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
योजनेचा आरंभ -1 जानेवारी 2017
लाभार्थी - देशातील महिला
आधिकारिक वेबसाईट - https://wcd.nice.in/
लाभ - आर्थिक लाभ 6000/- रुपये
उद्देश्य - गर्भवती महिलांच्या आरोग्याची देखभाल आणि त्यांच्या पोषणासाठी आर्थिक सहाय्य
विभाग - महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार
श्रेणी - केंद्र सरकारी योजना
वर्ष- 2023
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाइन/ऑफलाईन
Published on: 11 October 2023, 06:08 IST