मुंबई: मित्रांनो आपला देश शेती प्रधान (Agricultural Country) असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी केंद्र सरकारकडून (Central Government) अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकर्यांना (Farmer) आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे मोदी सरकारचे देखील महत्वाचे उद्दिष्ट आहे.
या अनुषंगाने पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) मोदी सरकारने सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 36,000 रुपये पेन्शनचा लाभ दिला जात आहे. 60 वर्षांवरील शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात.
यामुळे म्हातारपणात शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मात्र, यासाठी आधी शेतकऱ्यांना गुंतवणूक करावी लागते. यामुळे आज आपण मोदी सरकारच्या (Modi Government) या महत्वाकांक्षी योजनेविषयी (Government Scheme) सर्व नियम जाणून घेऊया
हेही वाचा
Pm Kisan : ई-केवायसी केली नाही तरी मिळणार का पीएम किसान योजनेचा 11वा हफ्ता; काय सांगितलं सरकारने
पीएम किसान मानधन योजनेत गुंतवणूक कशी आणि किती
पीएम किसान मानधन योजनेत 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सुरवातीला काही ठराविक अमाऊंट गुंतवणूक करावी लागेल यानंतर पेन्शनचा लाभ शेतकरी घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळते.
हेही वाचा
पेन्शन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधी छोटी गुंतवणूक करणे आवश्यक मानले जाते. यासाठी 55 ते 200 रुपये दरमहा गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. ही गुंतवणूक रक्कम वयाच्या आधारावर ठरवली जाते. 18 व्या वर्षी 55 रुपये आणि वयाच्या 40 व्या वर्षी 200 रुपये गुंतवणूक करावी लागते. गुंतवणूक केल्यानंतर वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळू लागते.
याचा लाभ या शेतकऱ्याला मिळतो
2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेल्या सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणे शक्य होते. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याचा लाभ पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणारे शेतकरी देखील घेऊ शकतात.
हेही वाचा
Published on: 03 May 2022, 07:31 IST