शेतकरी वर्गावर संकटांची मालिका ही कायमच सुरू असते कधी दुष्काळाशी सामना तर कधी अतिवृष्टी तर कधी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस तर कधी रोगराई यामुळे शेतकरी वर्ग नेहमी तोट्यात जात आहे. हातातोंडाशी आलेला पीक रानात तसच उभ सोडून द्यावं लागत आहे.
शेती करायची म्हटल की सर्वात महत्वाचे म्हणजे कष्ट करण्याची तयारी आणि संकटांशी सामना करायसाठी हिम्मत गरजेची असते. कारण जर काढणीच्या वेळी अचानक पाऊस आला तर केलेली मेहनत आणि घातलेला पैसा हा वाया जात असतो. कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ तर कधी रोगराई यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे काही भागात तर अतिृष्टीमुळे पिके वाहून गेली यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गाच्या हातची पिके गेल्यामुळे शेतकरी वर्गाला मोठाच आर्थिक फटका बसलेला आहे. मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्गाची मदत सरकार करेल अशी आशा या बांधवांनी पकडली आहे.
केंद्र सरकार शेतकरी वर्गाच्या हितासाठी अनेक योजना आमलात आणत आहे त्यामधील च ही योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल बिमा योजना ही आहे. या योजनेच्या अंतर्गत अतिृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना मदत केली जाते.नैसर्गिक आपत्तीत या विमा योजनेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येते. आतापर्यंत जवळपास 36 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
देशातील प्रत्येक नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत. लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना ऑनलाइन आणि ऑफलाईन अर्ज भरावे लागतात. जर का तुम्हाला घरबसल्या अर्ज जमा करायचा असेल तर https://pmfby.gov.in या वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. याठिकाणी सर्व विहित प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नोंदणी केल्यावर पिकांची पडताळणी केल्यानंतर डायरेक्ट 24 तासांच्या आत आपली रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होत असते. या योजनेत सहभागी होण्यासाठी राशन कार्ड, बँक खाते, आधार क्रमांक आवश्यक आहे. पासपोर्ट फोटो, शेतीचा खासरा क्रमांक, रहिवाशी दाखला(वाहन परवाना, मतदान ओळखपत्र), आदी कागदपत्रांचा यामध्ये समावेश आहे.
Published on: 18 September 2022, 01:46 IST