Government Schemes

पंतप्रधान किसान सम्मान निधि योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात. यापैकी बाराव्या हप्त्याचे वितरण कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे काल कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळाला असून दिवाळीच्या तोंडावर शेतकरी बंधूंना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.

Updated on 18 October, 2022 6:53 PM IST

पंतप्रधान किसान सम्मान निधि योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात. यापैकी बाराव्या हप्त्याचे  वितरण कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे काल कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळाला असून  दिवाळीच्या तोंडावर शेतकरी बंधूंना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.

नक्की वाचा:PM Kisan: शेतकऱ्यांनो प्रतीक्षा संपली! पीएम मोदी उद्या खात्यात जमा करणार 12 वा हप्ता, 16000 कोटी होणार खर्च

या योजनेचा फायदा आठ कोटी शेतकऱ्यांना मिळाला असून त्यापोटी एकूण सोळा हजार कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली.

परंतु काही कारणास्तव तुम्ही लाभार्थी आहात परंतु तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत किंवा नाहीत हे तुम्ही तपासू शकता आणि जर पैसे आले नसतील तर कोणत्या नंबर वर तक्रार नोंदवायची, याबद्दलची माहिती या लेखातून  घेऊ.

 अशा पद्धतीने तपासा यादीतील तुमचे नाव

1- तुम्हाला तुमचे नाव यादीत तपासायचे असेल तर त्यासाठी सगळ्यात अगोदर पी एम किसान योजनेचे अधिकृत संकेतस्थळ https://pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

2- त्यानंतर स्क्रीन वरील होमपेज हा पर्याय निवडावा व त्या ठिकाणी बेनिफिशियरी स्टेटस अर्थात लाभार्थी स्थितीचा पर्याय निवडावा.

नक्की वाचा:आनंदाची बातमी! तब्बल पावणेदोन लाख शेतकऱ्यांना मिळाली पीक विम्याची भरपाई

3- त्यानंतर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडते व त्यानंतर तुम्ही राज्य, तुमच्या जिल्हा तसेच ब्लॉक आणि गावाच्या नावासहित विचारलेली सर्व माहिती नमूद करावी.

4- त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक खाते आणि तुमच्या आधार क्रमांकाची लिंक असलेला तुमचा रजिस्टर मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.

5- ही प्रक्रिया केल्यानंतर पी एम किसान लाभार्थी यादी 2022 तुमच्यासमोर ओपन होते या ठिकाणी तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

यादीत तुमचे नाव आहे परंतु खात्यात पैसे आले नाही तर या नंबर वर करा कॉल

 समजा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे परंतु खात्यात पैसे आले नाहीत, तर तुम्ही 155261/011-24300606 क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.

नक्की वाचाLIC ची 'ही' योजना खूपच खास; फक्त एकाच गुंतवणुकीवर मिळणार दरमहा 15 हजारांपर्यंत रक्कम

English Summary: if not get 2 thousand rupees of pm kisan scheme in your account so you can register complain on this number
Published on: 18 October 2022, 06:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)