Government Schemes

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना जाहीर केली आहे. मागेल त्याला शेततळे म्हणजेच (वैयक्तिक शेततळे) अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे असे आवाहन सरकारकडुन करण्यात आले आहेत.

Updated on 30 September, 2023 1:04 PM IST

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना जाहीर केली आहे. मागेल त्याला शेततळे म्हणजेच (वैयक्तिक शेततळे) अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे असे आवाहन सरकारकडुन करण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. या योजनेमध्ये सन २०२३-२४ या वर्षासाठी ४ कोटी ४४ लाख ४४ हजार रुपये इतकी रक्कम अनुदानासाठी जाहीर करण्यार आलेली आहे. या योजनेंतर्गत विविध प्रकारच्या ८ आकारमानाच्या शेततळ्यासाठी ७५ हजार रुपये रक्कमेच्या मर्यादेत अनुदान देय राहणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांसाठी खालील पात्रता पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे:
शेतकरी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
शेतीची मालकी स्वतःच्या नावावर असावी.
शेतातील जमीन सिंचनायोग्य आवश्यक आहे.
शेतकऱ्याने यापूर्वी कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
ऑनलाईन अर्ज भरताना खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे:
ओळखपत्र जसे की -आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड इ.
जमीन मालकीचे पुरावे असणे आवश्यक आहे - सातबारा उतारा, ८ अ उतारा, मालमत्ता नोंदपत्र इ.
सिंचनाची गरज असल्याचे पुरावे द्यावे लागणार - पाण्याचे स्रोत, सिंचन पद्धत इ.


शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर, त्यांच्या अर्जाची माहिती मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडे तपासणीसाठी जाईल. अर्ज तपासणी झाल्यानंतर, पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन पूर्वसंमती दिली जाणार आहे. पूर्वसंमती मिळाल्यानंतर, काम पूर्ण करून शेतकऱ्यांना त्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाला सादर करावी लागणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर, शेतकऱ्यांना अनुदान थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी महाडीबीटी पोर्टला https://mahadbt.maharashtra.gov.in भेट द्या, किंवा जवळच्या कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

English Summary: How to apply for personal farm pond know complete information shetkari tale
Published on: 30 September 2023, 12:35 IST