Government Schemes

कृषी क्षेत्राच्या प्रगतीकरिता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या योजना राबविण्यात येतात त्या अंतर्गत अनुदान स्वरूपामध्ये मदत करण्यात येते. राज्य सरकारच्या देखील अनेक योजना असून त्यामध्ये यांत्रिकीकरणाशी संबंधित तसेच सिंचनाच्या सोयी सुविधा शेतकऱ्यांना उभ्या करता याव्यात याकरिता देखील योजना आहेत. एवढेच नाही तर फळबाग लागवडीकरता देखील काही योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते.

Updated on 12 August, 2023 9:27 AM IST

 कृषी क्षेत्राच्या प्रगतीकरिता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या योजना राबविण्यात येतात त्या अंतर्गत अनुदान स्वरूपामध्ये मदत करण्यात येते. राज्य सरकारच्या देखील अनेक योजना असून त्यामध्ये यांत्रिकीकरणाशी संबंधित तसेच सिंचनाच्या सोयी सुविधा शेतकऱ्यांना उभ्या करता याव्यात याकरिता देखील योजना आहेत. एवढेच नाही तर फळबाग लागवडीकरता देखील काही योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते.

या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करणे गरजेचे असते. जर आपण मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा विचार केला तर ही योजना शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी निर्माण करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देते आणि आर्थिक मदत देखील करते.

याच योजनेच्या संदर्भात नांदेड जिल्ह्यात सन 2022 ते 23 व 2023 ते 24 या आर्थिक वर्षामध्ये 1428 शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते व यापैकी 654 अर्ज प्रक्रियेत असून 369 शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी पूर्वसंमती मिळाली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी यामध्ये आवश्यक कागदपत्रे अद्याप अपलोड केलेले नाहीत.tयामुळे संबंधित शेतकऱ्यांनी ते अपलोड करावीत व त्यांचा पूर्व संमती मिळेल. या योजनेच्या माध्यमातून शेततळ्याच्या आकारमानानुसार अनुदानाची रक्कम देण्यात येते.

या योजनेसाठी पात्रता

 तर तुम्हाला देखील या योजनेच्या अंतर्गत शेततळे खोदायचे असेल तर त्यासाठी काही पात्रता आहेत. यातील महत्त्वाचे पात्रता म्हणजे शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर कमीत कमी 0.40 हेक्टर क्षेत्र असणे गरजेचे आहे. तसेच ज्या जमिनीवर शेतकरी शेततळे खोदणार आहेत ती जमीन आवश्यक तांत्रिक दृष्ट्या योग्य असणे देखील गरजेचे आहे. तसेच अर्जदार लाभार्थ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेच्या माध्यमातून शेततळे या घटकाकरिता अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

 अशा पद्धतीने होते निवड

 या अंतर्गत अनुदानाचा लाभ मिळवायचा असेल तर याकरिता https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. याकरिता शेतकरी स्वतःच्या मोबाईल वरून देखील अर्ज करू शकतात किंवा सीएससी सेंटर किंवा ग्रामपंचायतीमधील केंद्रावर जाऊन सदर संकेतस्थळावर अर्ज करावा.या योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता जे काही अनुदान उपलब्ध असेल त्या प्रमाणामध्ये संगणकीय प्रणालीतून सोडत नुसार अनुदानाचा लाभ देण्यात येतो.

 शेततळ्याचे विविध आकारमान आणि मिळणारे अनुदान

1- पंधरा बाय पंधरा बाय तीन मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी 28 हजार 275 रुपये

2- वीस बाय पंचवीस बाय तीन मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी 31 हजार 598 रुपये

3- वीस बाय वीस बाय तीन मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी 41,218 रुपये

4- 25 बाय वीस बाय तीन मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी 49 हजार 671 रुपये

5- 25 बाय 25 बाय तीन मीटर आकाराच्या शेततळ्याकरिता 58 हजार 700 रुपये

6- 30 बाय 25 बाय तीन मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी 67 हजार 728 रुपये

7- 30 बाय 30 बाय तीन मीटर आकाराच्या शेततळ्याकरिता 75 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.

English Summary: How much subsidy does a farm of which size get? Read complete information
Published on: 12 August 2023, 09:27 IST