गुंतवणुकीसाठी विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. काही व्यक्ती शेअर बाजारात गुंतवणूक करतात तर काही मॅच्युअल फंडाचा आधार घेतात. त्यापैकी बरेच जण एलआयसी कडे एक विश्वासू पद्धतीने पाहतात व बरेच जण एलआयसीत गुंतवणूक करतात. गुंतवणूक करताना प्रत्येकाची एकच इच्छा असते ती म्हणजे आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी आणि मिळणारा परतावा हा उत्तम मिळावा ही होय.
या सगळ्यात पर्यायाने सोबतच पोस्ट ऑफिसच्या देखील विविध प्रकारच्या उत्तम अशा गुंतवणूक योजना आहेत. त्यापैकी बऱ्याच योजनांची माहिती आपण अनेक लेखांच्या माध्यमातून घेतली आहे. आजच्या या लेखात देखील आपण अशाच एका उपयुक्त पोस्ट खात्याच्या गुंतवणूक योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.
पोस्ट खात्याची फायदेशीर ग्राम सुरक्षा योजना
ही योजना एक जीवन विमा पॉलिसी असून ज्यामध्ये पॉलिसी घेतल्यानंतर पाच वर्षे पूर्ण झाले की एंडोमेंट ॲशुरन्स पॉलिसीमध्ये रूपांतरित करण्याचे वैशिष्ट्य आहे.
या माध्यमातून पॉलिसी घेणारा वयाच्या 55, 58 किंवा साठ वर्ष वयापर्यंत प्रीमियम भरून जास्तीत जास्त लाभ मिळवू शकतात.
या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये
1- 19 वर्ष ते 55 वर्ष वयोगटातील कोणतीही भारतीय नागरिक या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करू शकते.
2- या योजनेमध्ये कमीत कमी विम्याची रक्कम ही दहा हजार रुपये असून जास्तीत जास्त दहा लाख रुपये आहे.
3- या योजनेत तुम्ही महिन्याला, तीन महिन्याला, सहामाई किंवा वार्षिक बेसवर हप्ते भरू शकतात.
4- योजना सुरू केल्यानंतर चार वर्ष पूर्ण झाले की तुम्हाला कर्ज देखील घेता येऊ शकते.
5- तीन वर्षे पूर्ण झाले तर पॉलिसीधारक पॉलिसी सरेंडर करू शकतात. परंतु पॉलिसी सरेंडर केल्यास योजनेत मिळणारा बोनसचा लाभ मिळत नाही. यामध्ये शेवटचा जाहीर केलेला बोनस 60 रुपये प्रति एक हजार रुपये विम्याची रक्कम वार्षिक असा आहे.
दररोज पन्नास रुपये करा जमा मिळतील 35 लाख रुपये
या योजनेच्या माध्यमातून पॉलिसीधारकाला फक्त पन्नास रुपयांच्या रोजच्या ठेवीवर 35 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो.
या हिशोबाने एखाद्या व्यक्तीने जर प्रति महिन्याला पॉलिसीमध्ये एक हजार पाचशे पंधरा रुपये जमा केले आणि पॉलिसी जर दहा लाख रुपयांची असेल तर त्याला मॅच्युरिटी वर 34 लाख 60 हजार रूपये मिळतात.
55 वर्षाच्या मॅच्युरिटी वर 31 लाख 60 हजार, 58 वर्षाच्या मॅच्युरिटी वर 33 लाख 40 हजार आणि साठ वर्षाच्या मॅच्युरिटी वर 34 लाख 60 हजार रुपये मिळतात.
Published on: 15 July 2022, 11:59 IST