Government Schemes

शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार नवनवीन योजना राबवत आहे. त्यापैकी प्रधानमंत्री कुसुम योजना शेतकऱ्यांच्या पसंतीची ठरत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या शेतात 60 टक्के अनुदानावर सौरपंप बसवू शकतात.

Updated on 23 July, 2022 5:43 PM IST

शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार नवनवीन योजना राबवत आहे. त्यापैकी प्रधानमंत्री कुसुम योजना (Pradhan Mantri Kusum Yojana) शेतकऱ्यांच्या पसंतीची ठरत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या शेतात 60 टक्के अनुदानावर सौरपंप बसवू शकतात.

प्रधानमंत्री कुसुम या योजनेअंतर्गत (PM Kusum Yojana 2022) सरकारकडून शेतकऱ्यांना सौरपंपाचे (Solar Pump) अनुदान दिले जात आहे. पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 60 टक्के अनुदानावर सौरपंप दिले जातात. हा प्लांट खरेदी करण्यासाठी आणि उभारण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त 10 टक्के रक्कम दिली जाते. उर्वरित शेतकऱ्यांनाही सरकारकडून 30 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळते.

हे ही वाचा 
बाप रे बाप! बाजारपेठेत मटनापेक्षा महाग मशरूम; जंगली मशरूमची होतेय चर्चा

ही योजना सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना (farmers) सौरपंप खरेदी करणे खूप महागात पडले होते. पण आता शेतकरी सोलर पंप लावून सहजपणे आपल्या शेतात सिंचन करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वीजेवर खर्च होणारा पैसाही वाचतो, त्यामुळे शेतीचा खर्चही कमी होऊन उत्पादनात वाढ होते.
शेतकरी वीज विकून नफा कमवू शकतील. 

हे ही वाचा 
मोठी बातमी! पशुपालकांसाठी घरपोच पशुरुग्ण सेवा; 'या' टोल फ्री क्रमांकावर साधा संपर्क

जर तुम्ही 4 ते 5 एकर जमिनीवर सोलर पंप प्लांट (Solar pump plant) लावला असेल तर तुम्ही एका वर्षात सुमारे 15 लाख वीज युनिट्स निर्माण करू शकता. वीज विभागाकडून ते सुमारे 3 रुपये 7 पैसे दराने विकत घेतल्यास, तुम्हाला वार्षिक 45 लाखांपर्यंतचे उत्पन्न सहज मिळू शकते. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही PM कुसुम योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकता.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांचे अच्छे दिन! फ्लॉवरच्या 'या' वाणाच्या लागवडीतून शेतकरी घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न
Organic Fertilizers: अवघ्या 18 दिवसात शेतकऱ्यांचे जीवन बदलेल; 'या' सेंद्रिय खताची होतेय चर्चा
आताची मोठी बातमी! 5 वर्षात विमा कंपन्यांनी तब्बल 40,000 कोटींची केली कमाई

English Summary: Govts Fantastic Offer electricity irrigation
Published on: 23 July 2022, 05:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)