रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी जवळपास आटोपली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ज्वारी बाजारात दाखल झाली आहे. असे असताना तेलंगणा राज्यात ज्वारीची किमान आधारभूत किमतीने (हमीभाव) तेलंगणा राज्य सरकार खरेदी करणार असल्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी केली आहे.
रब्बी ज्वारीच्या खरेदीबाबत कृषी व मार्कफेड अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
संकरीत ज्वारीची तेलंगणा सरकार २ हजार ९७० रुपयांनी ६५ हजार ४९४ टन खरेदी करणार आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्य रब्बी ज्वारीच्या उत्पादनात अग्रेसर आहेत.
राज्यात पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रती एकर 10 हजार रुपये द्या, शेतकऱ्यांसाठी आयुक्त मैदानात..
दरम्यान, मार्कफेड एजन्सीच्याद्वारे ही खरेदी करण्यात येणार आहे. ज्वारीच्या खरेदीसाठी मार्कफेड एजन्सीला तेलंगणा सरकारने बँक आणि वित्तीय संस्थांकडून २२० कोटी कर्ज घेण्यासाठी सरकारने सूचना केल्या आहेत.
ऊस उत्पादकांची देयके पंधरा दिवसांत द्या, नाहीतर सहकार मंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन
दरम्यान, केंद्र सरकार दर वर्षी ज्वारीसाठी हमीभाव जाहीर करतं. परंतु ज्वारीची सरकारी खरेदी किरकोळ होते. त्यामुळे हमीभाव कागदावरच राहतात. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत नाही.
बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
KJ Chaupal मध्ये भारत आणि ब्राझीलमधील सहकार्य आणि सांस्कृतिक संबंधावर चर्चा
16 गोणी कांदा, पट्टी लागली 71 रुपये, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी...
Published on: 17 May 2023, 10:15 IST