Government Schemes

Government Scheme: केंद्र व राज्य सरकारे वेळोवेळी गरीब लोकांच्या उज्वल भविष्यासाठी अनेक फायदेशीर योजना राबवत असते. या योजना राबवण्याचा उद्देश हा गरीब लोकांचे जीवनमान उंचावणे हाच असतो. गरीब लोकांना आपल्या काही छोट्या-मोठ्या गरजा पूर्ण करता याव्यात व त्या लोकांचे आयुष्य सोयीचे व्हावे यासाठी सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत असते. केंद्र सरकारने सुरू केलेली 'अटल पेन्शन योजना ही देखील अशीच गरीब कल्याणाच्या योजना आहे.

Updated on 23 June, 2022 9:41 PM IST

या योजनेत दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवली तर आपले पुढचे आयुष्य आरामात जाईल व म्हातारपणी कुणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुमचे म्हातारपणाचे दिवस चांगले प्रकारे जातील, तसेच तुम्ही तुमच्या आयुष्यातील शेवटचे दिवस चांगल्या प्रकारे घालवू शकता.

लईचं झाक ऑफर! 14 हजारात TVS Apache आणा आपल्या घरी, Apache वर फिरण्याची करा इच्छा पुरी; कस ते जाणून घ्या

हा या योजनेचा फायदा आहे

ज्यांचे वय 18 ते 40 दरम्यान आहे ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात. लोकांनी या योजेनेचा फायदा जरूर घ्यावा जे कि आपल्या पुढील आयुष्यासाठी खूप गरजेचे आहे. अटल पेन्शन योजनेत, तुम्हाला 20 वर्षे सतत दर महिन्याला 210 रुपये गुंतवावे लागतात, म्हणजे दररोज 7 रुपये.

यानंतर तुम्हाला 60 वर्षांनंतर दर महिन्याला 5000 रुपये पेन्शन मिळते. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या योजनेअंतर्गत खाते उघडले तर तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.

Birthday Special: आई 100 रुपये कमवायची तेव्हा जेवण मिळायचं! आज थलापति विजय एका चित्रपटाचे घेतो 100 कोटी

इथे आम्ही नमूद करू इच्छितो की, या योजनेचा लाभ फक्त 18 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्तींनाच मिळू शकतो. चला तर मग वाट कसली बघता लगेचच ह्या योजेनेचा लाभ घ्या व आपले पुढील आयुष्य आनंदात व्यतित करा. निश्चितच केंद्र सरकारची ही एक कल्याणकारी योजना आहे.

या योजनेच्या माध्यमातून लोकांना आपल्या वृद्धापकाळात मोठा आर्थिक सहारा उपलब्ध होणार आहे. यामुळे जर तुम्हाला देखील आपले म्हातारपण आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल तर ही योजना निश्चितच आपल्या साठी वरदान ठरणार आहे.

7th pay commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या महिन्यापासून 'इतका' वाढणार पगार

English Summary: government scheme atal pension yojana information
Published on: 23 June 2022, 09:41 IST