शेतकऱ्यांचे (farmers) उत्पन्न वाढावे यासाठी सरकार प्रयत्न करत असते. आता छत्तीसगड सरकारनेही (Chhattisgarh Govt) शेतकऱ्यांसाठी (government) मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार 28 जुलैपासून हरेली सणानिमित्त किमान 4 रुपये प्रति लिटर दराने गोमूत्र खरेदी करणार आहे.
दोन वर्षांपूर्वी छत्तीसगड सरकारने हरेली सणाच्या निमित्ताने 'गोधन न्याय योजना' (Godhan Nyaya Yojana) सुरू केली होती. ज्या अंतर्गत पशुपालकांकडून शेण खरेदी केले जात आहे. 20 जुलै रोजी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये हस्तांतरित केले.
Ration Machine : बापरे बाप ! आता एटीएम मधून मिळणार गहू, तांदूळ ; ग्राहकांना मिळणार रेशन मशीन
गोमूत्र 4 रुपये प्रति लिटर
गोधन न्याय योजनेत (Godhan Nyaya Yojana) आधी सरकार फक्त शेण खरेदी करत होते पण आता सरकारने गोमूत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन स्वतंत्र गौठाणांमध्ये गोमूत्र खरेदी करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर गोमूत्राचे दर ठरवण्याचा अधिकार गौठाण व्यवस्थापन समितीला दिला आहे. कृषी विकास आणि शेतकरी कल्याण विभागाने किमान 4 रुपये प्रति लिटर दर प्रस्तावित केला आहे.
आताची सर्वात मोठी बातमी ; आता शेतकऱ्यांना मिळणार डिझेलमागे 60 रुपयांचे अनुदान
गोधन न्याय योजना
'गोधन न्याय योजना' (Godhan Nyaya Yojana) पशुपालक शेतकरी, सेंद्रिय शेतकरी (Organic farmers) यांना उत्पन्न मिळवून देण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. ज्या अंतर्गत शेणखत गौठाणमध्ये 2 रुपये प्रतिकिलो दराने शेणखत गांडूळ खत तयार करण्यात येत आहे. 'गोधन न्याय योजना' 20 जुलै 2020 रोजी सुरू करण्यात आली आहे. माहितीनुसार गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारने 150 कोटींहून अधिक किमतीचे शेण खरेदी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी; अकाऊंटमध्ये झीरो रक्कम असली तरी काढता येणार, पहा प्रोसेस..
शेतकरी मित्रांनो: मटक्यात मशरूम वाढवून व्हा करोडपती; हा आहे सोप्पा उपाय
ऐकलंत का ! 'या' शेतकऱ्यांना दिले जाणार 'इतके' अनुदान ; खात्यावर होणार रक्कम जमा
Published on: 21 July 2022, 06:02 IST