Government Schemes

कृषी क्षेत्रामध्ये आता नवनवीन तरुण उद्योजक पुढे येत आहे. बरेच तरुण हे कृषी व्यवसाय संबंधित प्रक्रिया उद्योगांमध्ये पुढे येत असून यश देखील मिळवत आहेत.

Updated on 26 April, 2022 9:51 PM IST

 कृषी क्षेत्रामध्ये आता नवनवीन तरुण उद्योजक पुढे येत आहे. बरेच तरुण हे कृषी व्यवसाय संबंधित प्रक्रिया उद्योगांमध्ये पुढे येत असून यश देखील मिळवत आहेत.

बरेच तरुण हे आयात-निर्यात  इत्यादी व्यवसायात देखील पुढे आहेत. अशा तरुण शेतकरी आणि कृषी उद्योजकांसाठीशासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे बरेच तरुणांना कृषी क्षेत्रात स्टार्टअप सुरु करणे शक्य होत आहे. शेतमालाचा विचार केला तर बराचसा  शेतमाल हा नाशवंत असल्यामुळे अशा मालाची निर्यात होण्याअगोदर किंवा विक्री होण्याअगोदर किंवा त्याच्यावर प्रक्रिया होण्याच्या अगोदर त्याची साठवणूक व्यवस्था असणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी कोल्ड स्टोरेज, कोल्ड चेन आणि फ्रोजन युनिट इत्यादींची गरज भासते. आता शासनाकडून अशाप्रकारच्या साठवणूक फ्रोजन युनिट साठी कृषी पायाभूत सुविधा निधीच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जावर तीन टक्के व्याज सवलत दिली जात आहे.

जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऍग्री इन्फ्रा च्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. शेतमाल दुसऱ्या राज्यांना पाठवणे अगोदर तो साठवून ठेवणे  खूप महत्त्वाचे असते व बरेच शेतकरी याला प्राधान्य देतात. त्यामुळे उद्यान विभागाच्या माहितीनुसार, असे लाभार्थी  कोल्ड स्टोरेज आणि इतर प्रकारचे फ्रोजन युनिट उघडण्यासाठी सरकारी साइटवर थेट अर्ज करू शकतात. कृषी पायाभूत सुविधा निधी च्या माध्यमातून  शीतगृह स्थापन करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर तीन टक्के व्याज सवलत आहे. एवढेच नाही तर कर्ज देणारी संस्था असतेया संस्थेला दोन कोटी रुपयांपर्यंतचा कर्जावर सरकारकडून बँक गॅरंटी दिली जाणार आहे. यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था, कृषी पणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था तसेच बचत गट, बहुउद्देशीय सहकारी संस्था, एकत्रित पायाभूत सुविधा पुरवठादार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. शेतमालाच्या काढणीनंतर उत्पादन व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा विकसित करणे हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे.

या योजनांतर्गत गोदाम, पॅक हाऊस, गोल्ड चेन, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट, रायपनिंग चेंबर, वॅक्सिंग युनिट आदींचा विकास करायचा आहे. योजना टॉप अप सिस्टम चा दुहेरी लाभ देते.( स्त्रोत- कृषी रंग )

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Farming Business Idea : शेतकरी बांधवांनो किन्नू पिकाची लागवड करा आणि कमवा बक्कळ नफा; वाचा याविषयी

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी महत्वाचे!! प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज; शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला

नक्की वाचा:Farming Business : शेतकरी मित्रांनो अधिकचा फायदा हवा आहे का मग करा केसरची शेती करा; मालामाल होणार

English Summary: goverment give subsidy for establish cold storage and cold chain
Published on: 26 April 2022, 09:51 IST