Government Schemes

जानेवारी महिन्यात दराअभावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून दिला होता. बाजारात कमी दर होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले. त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अनुदान देण्याची घोषणा केली होती.

Updated on 06 September, 2023 4:17 PM IST

Onion Subsidy News :

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान राज्य सरकारने आज वितरित केलं आहे. या अनुदान वितरणाचा आज पहिला हप्ता ऑनलाईनच्या माध्यमातून वितरीत करण्यात आला आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत-जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदानाच्या पहिल्या टप्प्यात ३ लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे. उर्वरित अनुदानाचा दुसरा टप्पा लवकरच देण्यात येणार आहे.

जानेवारी महिन्यात दराअभावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून दिला होता. बाजारात कमी दर होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले. त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अनुदान देण्याची घोषणा केली होती. आज मंत्रिमंडळाची बैठक चालू असताना शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

-मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत
-मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव
-राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प
-आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज
-केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट
-मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात

English Summary: Good news Relief to onion producers decision to give subsidy to farmers
Published on: 06 September 2023, 04:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)