केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यापासून अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. याचा सर्वसामान्य लोकांना फायदा व्हावा, हा उद्देश आहे. सरकारने जनधन योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर बँकांमध्ये खाती उघडली होती, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता मोदी सरकार जनधन खातेदारांना एका नव्या योजनेचा लाभ देत आहे. यामुळे याचा लोकांना फायदा होणार आहे. तुम्ही जनधन योजनेत खाते उघडले असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे.
मोदी सरकार पीएम श्रम योगी मानधन योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यात दरमहा तीन हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जातील. यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाही. फक्त तुमचे आधार कार्ड द्यावे लागेल आणि तुमच्या वृद्धापकाळात तुम्हाला जनधन खात्यातून दरमहा तीन हजार पेन्शन मिळेल. यामुळे ही योजना फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये दरमहा तीन हजार रुपये जनधन खात्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात.
यामध्ये असंघटित क्षेत्रात काम करणारी प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. असंघटित क्षेत्रात हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन आणि मजूर यांचा समावेश होतो. यामुळे त्यांना याचा फायदा होणार आहे. पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पीएम श्रम योगी मानधन योजनेत नोंदणी करावी लागणार आहे.
शेतकऱ्यांनो काळजी घ्या, आता बनावट कीटकनाशके बाजारात, अशी करा खात्री...
दरम्यान, ही नोंदणी तुम्ही जनधन खात्याच्या ऑनलाइन वेबसाइटवर जाऊन करू शकता. तसेच तुमच्या जवळील बँकांमध्येही नोंदणी करून खाते उघडता येते. मात्र हे खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्यावरून सर्व गोष्टी बघितल्या जाणार आहेत. यामुळे ही एक फायदेशीर योजना आहे.
महत्वाच्या बातम्या;
राज्यात पावसाचा धुमाकूळ, 30 धरणे भरली, शेतकऱ्यांची काळजी मिटली..
शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
अशी शेती केली तर शेतकऱ्यांची पण लग्न होतील!! पट्ठ्याने बँक मॅनेजरच्या नोकरी सोडून केली शेती, आज लाखो कमवतात
Published on: 11 July 2022, 11:15 IST