Government Schemes

राज्यातील शेतकरी अनेक दिवसांपासून अडचणीचा सामना करत आहे. कोरोना काळात त्याला मोठा आर्थिक फटका बसला. यामुळे त्याला आर्थिक आधाराची गरज आहे. राज्यात यावर्षी खरीप हंगामासाठी पीकविमा योजनेत 15 जुलै पर्यंत 13 लाख 32 हजार 783 शेतकर्‍यांनी सहभाग घेतला आहे. यासाठी तब्बल 603 कोटी 28 लाख रुपयांचा विमा हप्ता रक्कम आलेली आहे. यामुळे या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Updated on 17 July, 2022 11:34 AM IST

राज्यातील शेतकरी अनेक दिवसांपासून अडचणीचा सामना करत आहे. कोरोना काळात त्याला मोठा आर्थिक फटका बसला. यामुळे त्याला आर्थिक आधाराची गरज आहे. राज्यात यावर्षी खरीप हंगामासाठी पीकविमा योजनेत 15 जुलै पर्यंत 13 लाख 32 हजार 783 शेतकर्‍यांनी सहभाग घेतला आहे. यासाठी तब्बल 603 कोटी 28 लाख रुपयांचा विमा हप्ता रक्कम आलेली आहे. यामुळे या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मात्र या योजनेत सहभागाची 31 जुलै ही अखेरची तारीख आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे. तसे पाहिले तर मराठवाड्यातील शेतकर्‍यांचा पीकविमा योजनेत सर्वाधिक सहभाग आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात 142 लाख हेक्टरवरील पेरण्यांचे नियोजन कृषी विभागाने केलेले आहे. याचा विचार करता सद्यस्थितीत 7 लाख 32 हजार 480 हेक्टरवरील पिकांसाठीच शेतकर्‍यांनी पीकविमा उतरविला आहे.

शेतकर्‍यांनी योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम मुदतीची वाट पाहू नये कारण शेवटच्या दिवसात गर्दी होऊन ऑनलाइन पोर्टलची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे कामे लवकर उरकून घ्यावीत असेही आवाहन करण्यात आले आहे. या योजनेत अनेकदा बदल देखील झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. तसेच अनेकांचे पैसे देखील मिळाले नव्हते.

शेतकऱ्यांना कोट्यावधील गंडा घालणारा अटकेत! उकीरड्यात पुरुन ठेवलेले लाखो रुपये..

जिल्हानिहाय शेतकरी सहभागाची संख्या पुढीलप्रमाणे -
बीड 3 लाख 80 हजार 815, नांदेड 2 लाख 49 हजार 240, परभणी 1 लाख 1 हजार 781, औरंगाबाद 90 हजार 706, जालना जिल्ह्यात 78 हजार 77, लातूर 62 हजार 679, हिंगोली 59 हजार 367 शेतकर्‍यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. तर पुणे 561, सातारा 97, सांगली 767, कोल्हापूर 889, सोलापूर 26 हजार 174, अहमदनगर 12 हजार 121, नाशिक 11 हजार 740, पालघर 106, रायगड 145, ठाणे 975, रत्नागिरी 139, सिंधुदुर्ग 273 शेतकर्‍यांनी सहभाग घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या;
Petrol Diesel Rates : आता पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होणार? पहा आजचे नवीन दर
देशात महागाई वाढणार! 18 जुलैपासून खिश्यात जास्तीचे पैसे ठेवा...
शेतकऱ्यांनो 'ही' टेक्निक वापरा आणि टॉमेटोमधून लाखो कमवा, जाणून घ्या...

English Summary: Good news! Good news for 13 lakh farmers, more than 603 crores collected
Published on: 17 July 2022, 11:34 IST