शेतीसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवण्यात येत आहे . या योजनेमुळे कोरडवाहू शेतजमिन असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे . या योजनेत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान दिले जाते. या योजनेद्वारे राज्य सरकारने कृषी सिंचनाला प्राधान्य दिले आहे आणि कमी पाण्याच्या शेताला जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी अनुदान देऊन प्रोत्साहित केले आहे .जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार -
नवीन विहीरसाठी - 2 लाख 50 हजार रुपये
इनवेल बोअरींगसाठी- 20 हजार रुपये
पम्प संचासाठी - 20 हजार रुपये
वीज जोडणीसाठी - 10 हजार रुपये
शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी- 1 लाख रुपये
सूक्ष्म सिंचन संचासाठी - ठिबक सिंचन संच - 50 हजार किंवा तुषार सिंचन संच- 25 हजार
पीव्हीसी पाईप - 30 हजार रुपये
परसबाग - ५०० रुपये
या योजनेअंतर्गत पात्रता –
जातीचा दाखला
७/१२ व ८-अ चा उतारा
वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या आत असायला हवे
उत्पन्नाचा चालू वर्षाचा दाखला
जमीन ०.२० हेक्टर ते ६ हेक्टर पर्यंत असणे आवश्यक आहे
शेतकरी अनुसूचित जमातीचा असल्यासच अर्ज करावा.
या योजनेअंतर्गत हे जिल्हे वगळ्यात आले आहेत -
मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल.
अर्ज कुठे करायचा -
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
Published on: 16 October 2023, 03:14 IST