Government Schemes

शेती व्यवसाय करतांना अनेकदा अपघात होतात. जसे कि वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे,पाण्यात बूडून मृत्यू होणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहीना अपंगत्व येते.

Updated on 19 October, 2023 4:19 PM IST

शेती व्यवसाय करतांना अनेकदा अपघात होतात. जसे कि वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे,पाण्यात बूडून मृत्यू होणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहीना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे राज्य सरकार गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार आहे.

या योजनेअंर्तगत किती अनुदान मिळणार -
अपघाती मृत्यू - 2,00,000 रुपये
अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे - 2,00,000 रुपये
अपघातामुळे एक डोळा एक हात किंवा एक पाय निकामी होणे -2,00,000 रुपये
अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे 1,00,000 रुपये

अर्जासाठी कागदपत्रे -
७/१२ उतारा
मृत्यूचा दाखला
गांवकामगार तलाठ्याकडील गाव नमना नं.६-क नूसार मंजूर झालेली वारसाची नोंद
शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणी करीता शाळा सोडल्याचा दाखला
आधारकार्ड/निवडणूक ओळखपत्र. ज्या कागदपत्रा आधारे ओळख/वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे
प्रथम माहिती अहवाल/स्थळ पंचनामा/पोलीस पाटील माहिती अहवाल
अपघाताच्या स्वरुपानूसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची आहे

या योजनेअंतर्गत पात्रता -
रस्ता/रेल्वे अपघात,पाण्यात बुडून मृत्यू,वीज पडून,जंतुनाशक हाताळताना/अन्य कारणांमुळे विषबाधा, वीजेचा शॉक लागून, खून, उंचावरुन पडून मृत्यू, सर्पदंश,नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावराने खाल्यामुळे/चावण्यामुळे - मृत्यू किंवा अपंगत्व, दंगल, बाळंतपणातील मृत्यू, अन्य कोणतेही अपघात.

या योजनेची अधिक माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

English Summary: Good news for the farmer Subsidy under this scheme will be available after the accident
Published on: 19 October 2023, 04:19 IST