पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे PM किसान योजनेचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आले आहे.
आत्तापर्यंत या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथील कार्यक्रमादरम्यान वितरण करण्यात आला होता. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (eKYC) करणं बंधनकारक आहे. त्यामूळे eKYC न केल्यास शेतकऱ्यांचं 2 हजार रुपयांचे नुकसान होऊ शकते.
ई-केवायसीची प्रक्रिया -
सर्वप्रथम पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जावे
वेबसाइटवर ई-केवायसी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे
त्यानंतर तिथे आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा
सर्च पर्यायावर क्लिक करा
आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका
त्यानंतर मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका
त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा
यासर्व प्रक्रिया नंतर केवायसी पूर्ण होईल.
Published on: 13 November 2023, 11:49 IST