सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकांना दुष्काळ, वादळ, खराब हवामान पाऊस, पूर इत्यादी जोखमीपासून संरक्षण दिले जाते.
या योजनेचा मुख्य उद्देश नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना माफक दरात विमा संरक्षण देणं आहे. आतापर्यंत सुमारे 36 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. केंद्र सरकारनं खरीप हंगाम 2016 पासून पीएम पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे झालेले नुकसान कव्हर केले जाते.
तसेच आता वन्य प्राण्यांकडून पिकांचं होणारं नुकसानही विमा संरक्षणात समाविष्ट करण्यात आलं आहे. बहुतांश राज्यांनी ही योजना स्वीकारली आहे. देशातील अनेक राज्यांतील शेतकरी पीएम पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज भरावा लागतो. हा अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे करता येतो. शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर ते पीएम पीक विमा योजनेच्या https://pmfby.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
धक्कादायक ! 'या' योजनेच्या 9 हजार मृत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा
अटी आणि शर्ती
शेतकर्यांनी पेरणीनंतर 10 दिवसांच्या आत विम्यासाठी अर्ज केला पाहिजे, कारण त्यानंतरच कोणतेही पीक विम्यासाठी पात्र मानले जाते. रेशनकार्ड, आधारशी लिंक केलेला बँक खाते क्रमांक, ओळखपत्र, शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो, शेताचा गट क्रमांक, शेतकऱ्याचे रहिवासी प्रमाणपत्र शेत असल्यास भाड्याने घेतल्यास, शेतमालकाशी केलेल्या कराराची छायाप्रत इ. कागदपत्रे जमा करावी लागतील.
मोठी बातमी ; पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता येणार 'या' तारखेला
या पिकांचा पीक विमा उतरवला जाणार
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत, कापूस पिकासाठी रु.36282
भात पिकासाठी रु.37484, बाजरी पिकासाठी रु.17639
मका पिकासाठी रु.18742
मूग पिकासाठी रु.16497 प्रति एकर
महत्वाच्या बातम्या
दिलासादायक बातमी! पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांचे वाटप
क्या बात है! अपंग पेन्शन योजनेचे ऑनलाइन अर्ज सुरू; इतकी मिळतेय पेन्शन
काय सांगता ! कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त? वाचा..
Published on: 22 July 2022, 04:56 IST