Government Schemes

प्रत्येकाला स्वतःचे घर असावे ही मनापासून इच्छा असते. परंतु समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींकडे अजूनही स्वतःचे पक्के घर नाही. अशा व्यक्तींना स्वतःच्या हक्काचे पक्के घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर बऱ्याच प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या माध्यमातून नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. जर आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून असलेल्या योजनांचा विचार केला तर यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ही महत्वपूर्ण आहे.

Updated on 01 December, 2022 3:38 PM IST

 प्रत्येकाला स्वतःचे घर असावे ही मनापासून इच्छा असते. परंतु समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींकडे अजूनही स्वतःचे पक्के घर नाही. अशा व्यक्तींना स्वतःच्या हक्काचे पक्के घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर बऱ्याच प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या माध्यमातून नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी  अनुदान दिले जाते. जर आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून असलेल्या योजनांचा विचार केला तर यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ही महत्वपूर्ण आहे.

त्यातच राज्य शासनाच्या माध्यमातून शबरी आवास योजना, रमाई आवास योजना तसेच पारधी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच आदीम आवास योजना सारख्या योजना महाराष्ट्र सरकारकडून राबवल्या जातात. या सगळ्या योजनांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे.

नक्की वाचा:बातमी महत्त्वाची! 'या' महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना मिळाली एकरी तब्बल 'इतक्या' लाखांची नुकसान भरपाई, वाचा डिटेल्स

आपल्याला माहित आहे की अशा योजनांच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्याला 279 चौरस कॉर्पेट एरिया असलेल्या जागेमध्ये एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार पर्यंतचे अनुदान दिले जाते व घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली जाते.

परंतु बऱ्याचदा घरकुल मंजूर होते परंतु अनेक व्यक्तींकडे घर बांधण्यासाठी स्वतःची जागा नसते. अशा घरकुल अनुदान योजनेसाठी पात्र परंतु भूमीहीन असलेल्या लाभार्थ्यांना  घर बांधण्यासाठी जागा खरेदी करता यावी यासाठी देखील अनुदान दिले जाते.

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना

 या योजनेच्या माध्यमातून घरकुल योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी 500 चौरस फूट कार्पेट एरिया जागा खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंतची शासनाकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील जे काही नागरिक अथवा शेतकरी बांधव असतील त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे परंतु स्वतःची जागा मिळालेले घर बांधण्यासाठी जागा नाही तर अशा लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून जागा खरेदी करता येणे शक्य आहे.

नक्की वाचा:Urea Subsidy: युरिया खरेदीसाठी सरकार देत आहे 2700 रुपये, या योजनेचा असा लाभ घ्या

एवढेच नाही तर अतिक्रमण नियमानुकूल करणे तसेच विनामूल्य शासकीय जमीन संबंधित लाभार्थ्यांना उपलब्ध करणे व इतर माध्यमांतून देखील अशा लाभार्थ्यांना जागेची उपलब्धता करून देण्यात येते.याबाबत एका अधिकृत आकडेवारीचा विचार केला तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या आणि इतर राज्य पुरस्कृत गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून एक लाख 11 हजार 856 एवढे भूमीहीन पात्र घरकुल लाभार्थी आहेत व यापैकी 58 हजार 321 एवढ्या लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नक्की वाचा:आनंदाची बातमी! पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये पैसे दुप्पट होतील, जाणून घ्या किती वेळ लागेल

English Summary: get 50 thousand rupees for land purchesing for home build through aawas yojna
Published on: 01 December 2022, 03:38 IST