शेतकऱ्यांना शेतीसंबंधित बाबी सुलभ आणि सोयीस्कर होण्यासाठी तसेच विविध फळपिकांची लागवड इत्यादीसाठी केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येऊन शेतकऱ्यांना असलेली भांडवलाची निकड या माध्यमातून मिळून शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळतो.
अशीच एक सरकारचे महत्त्वाची योजना आहे ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना फुलपिक, फळपीक व वृक्ष लागवडी करता तीन वर्षाच्या कालावधीत 100 टक्के अनुदान देण्यात येते. या लेखात योजनेविषयी माहिती घेऊ.
शासनाचे महत्त्वपूर्ण योजना
शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फळबाग,फुल शेती तसेच वृक्ष लागवडीसाठी तीन वर्षाच्या कालावधीत 100 टक्के अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येत असल्याने या योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी देखील केले आहे.
या योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या शेतात फुल पीक लागवड कार्यक्रम राबविण्यात येत असून लाभार्थ्याच्या शेतात निशिगंधा, मोगरा, गुलाब आणि सोनचाफा या फुलपिकांची लागवड करता येते व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या फूल पिकांच्या लागवडीसाठी एका वर्षामध्ये 100 टक्के अनुदान मिळणार आहे.
कुणाला मिळणार या योजनेचा फायदा?
1- अनुसूचित जाती/जमाती,दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, इंदिरा गांधी आवास योजनेचे लाभार्थी तसेच भूसुधार योजनेचे लाभार्थी यांना…
2-त्यासोबतच 2008 मध्ये जी काही कृषी कर्ज माफी योजना झाली होती त्या नुसार अल्पभूधारक व सिमांत शेतकरी,अनुसूचित जमातीचे वा अन्य परंपरागत वननिवासी अधिनियम 2006नुसार पात्रतेपैकी कोणत्याही एका अटीची पूर्तता करणारा लाभार्थी….
3- दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
कोणत्या कामांसाठी मिळेल फायदा?
या माध्यमातून लागवड आधीची पूर्वहंगाम मशागत, लागवडीसाठी खड्डे खोदणे व नंतर झाडांची लागवड, पाण्याची व्यवस्था, कीटकनाशके तसेच झाडांचे संरक्षण इत्यादी कामे लाभार्थ्यांनी स्वतः या योजनेच्या अंतर्गत तयार श्रमिक गटांद्वारे व जॉबकार्ड धारक मजुरांकडून करून द्यायचे आहेत.तसेच सातबारा उताऱ्यावर लागवड केलेली फुल पिके यांची नोंद करणे बंधनकारक आहे.
लागवडीचा कालावधी
सर्व प्रकारची फुले पिके व फळबागांच्या लागवडीचा कालावधी हा 1 जून ते 31 डिसेंबर पर्यंत राहील.
यासंबंधीचे आवाहन
तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक तसेच मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Published on: 25 August 2022, 11:35 IST