नवी मुंबई: मित्रांनो केंद्र सरकार गरीब लोकांच्या कल्याणासाठी कायम कल्याणकारी योजना राबवत असते. खरं पाहता केंद्र सरकारने मध्यमवर्गीय आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी एक खास योजना सुरू केली आहे. ही योजनाआहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना.
ही मोदी सरकारची एक योजना असून देशाच्या यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि मोफत गॅस कनेक्शनचा लाभ उचला.
मोदी सरकारने ही योजना विशेषत: ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळवून देण्यासाठी सुरू केली होती. चुलीत लाकूड, शेणाची गौरी आणि कोळसा वापरून अन्न शिजवणाऱ्या अशा महिलांना सरकारने मोफत गॅस सिलिंडरचा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गरीब महिलांना सुरुवातीला 3 मोफत गॅस सिलिंडर दिले जातात, त्यानंतर त्यांना घरगुती सिलिंडरपेक्षा कमी दराने गॅस सिलिंडर दिले जातात.
ही योजना 1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांनी गॅस कनेक्शनचा लाभ घेतला आहे. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर आपण देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.
अनेक महिलांना मिळाला फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या योजनेशी संबंधित सुमारे 5 कोटी महिलांना लाभ देण्याचे लक्ष्य ठेवले होते, परंतु ही संख्या वाढून 8 कोटी झाली. या योजनेनुसार एलपीजी कनेक्शन दिले जात असून, इतके कोटी मोफत कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
पीएम उज्ज्वला योजनेवरील सरकारी संस्था पीआयबीच्या अहवालानुसार, एलपीजी कव्हरेज 104.1 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, जे 20.16 टक्के होते. पीएम उज्ज्वला योजनेचा लाभ देताना गेल्या 6 वर्षांत 9 कोटींहून अधिक डिपॉझिट फ्री एलपीजी कनेक्शन देण्यात आल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. योजनेच्या लाभार्थ्यांपैकी 35.1 टक्के लाभार्थी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आहेत.
या योजनेचा लाभ ज्या महिलांचे वय 18 वर्षांहून अधिक असेल आणि ज्या दारिद्र्यरेषेखालील आहेत त्यांना मिळणार आहे. म्हणजेच जी कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली येतात मात्र जर एखाद्या महिलेच्या घरात आधीच गॅस कनेक्शन असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
बीपीएल प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, बीपीएल रेशन कार्ड, कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार फोटो प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, जनधन बँक खाते किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष किंवा पंचायत प्रधान यांनी जारी केलेले बँक पासबुक यासारखी आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहेत.
मोफत गॅस सिलिंडरसाठी अर्ज कसा करणार बरं
»या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या एलपीजी केंद्रावर जावे लागेल.
»येथे तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल.
»फॉर्ममध्ये, तुम्हाला तुमची सर्व माहिती द्यावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे देखील द्यावी लागतील.
»यासोबतच तुम्हाला किती किलोचा सिलिंडर लागेल हेही सांगावे लागेल.
Published on: 30 May 2022, 02:40 IST