Government Schemes

अनेक ठिकाणी राज्यात कमी पाऊस पडतो. यामुळे शेतकऱ्यांना शेततळे हाच यावर एकमेव उपाय आहे. आता शेतकऱ्यांना आता वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदानाचा अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर अर्ज पुन्हा सुरू झालेले आहेत.

Updated on 16 August, 2023 2:05 PM IST

अनेक ठिकाणी राज्यात कमी पाऊस पडतो. यामुळे शेतकऱ्यांना शेततळे हाच यावर एकमेव उपाय आहे. आता शेतकऱ्यांना आता वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदानाचा अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर अर्ज पुन्हा सुरू झालेले आहेत.

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा असे आवाहन कृषी विभागांमार्फत करण्यात आले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर शेततळ्यासाठी पुन्हा अर्ज सुरू झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून शेततळ्याचा लाभ घ्यावा असे आव्हान देखील कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यात कोरडवाहू तसेच खडकाळ जमीन अशा ठिकाणी शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता नसते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर उपलब्ध राहावे लागते. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण करून देणारी शेततळे योजनेमधून शेतकऱ्यांना अनुदान मिळते.

स्वीट कॉर्नची शेती करणारे शेतकरी कमावतात भरघोस नफा, जाणून घ्या..

यासाठी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असते. वैयक्तिक शेततळे तसेच सिंचन साधने व उपकरणांसाठी शेततळ्याच्या आकारमानावरून अनुदान ठरवले जाते. ही रक्कम पूर्वी पन्नास हजार एवढी होती.

यावर्षी या अनुदानामध्ये वाढ झाली. असून ही रक्कम आता ७५ हजार रुपये करण्यात आली आहे. यासाठी
जमिनीचा सातबारा आणि ८ अ उतारा
आधार कार्ड झेरॉक्स
बँक पासबुक झेरॉक्स
हमीपत्र आणि जातीचा दाखला.

जर तुम्हाला शेततळे बांधायचे असेल तर त्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. ज्या जमिनीवर शेततळे बांधायचे आहे ती जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे गरजेचे आहे.

भारतात काही अंतरावर माती बदलते, जाणून घ्या कोणाला सर्वात सुपीक मानले जाते?

शेततळे योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्याने मागेल त्याला शेततळे सामूहिक शेततळे किंवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेच्या माध्यमातून शेततळ्यासाठी कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

तुम्हाला जर शेततळ्यासाठी अर्ज करायचा असेल तर राज्य सरकारच्या महाडीबीटी संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. शेततळे योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत.

टोमॅटोच्या दरात होणार मोठी घसरण, मोदी सरकारचा शेतकरी विरोधी निर्णय..
महिंद्राचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी तिच्या ग्लोबल पिक अप संकल्पनेचे अनावरण

English Summary: Finally, the news has come for the farmers! Now apply for farm, know where and how to apply...
Published on: 16 August 2023, 02:05 IST