नैसर्गिक आपत्तींमुळे नेहमीच शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना १३ जानेवारी २०१६ पासून सुरू केली होती. आता केंद्र सरकार पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवण्याची तयारी करत आहे. शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमान योजने अंतर्गत होणारा लाभ वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने सरकारी अधिकाऱ्यांच्या एका हवालातून हा दावा केला असून या अहवालात म्हटलं आहे की, येत्या काही दिवसांत या योजनेंतर्गत तलाव, ट्रॅक्टर, जनावरे, ताडाची झाडे या गोष्टींच्या विमा संरक्षणाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून तयारी सुरू आहे.यासाठी सरकार 30 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची शक्यता आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, AIDA अॅप यावर्षी जुलैमध्ये सुरू करण्यात आलं होतं. या मोहिमेला AIDA PMFBY Scheme Crop Insurance द्वारे आणखी विकसित केलं जाऊ शकतं. येस-टेक, विंड्स पोर्टल आणि AIDE अॅपच्या माध्यमातून पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत. सरकारच्या प्रयत्नांमुळे 2022-23 मध्ये विमा योजनेंतर्गत विमा उतरवलेल्या क्षेत्रात 12 टक्के वाढ नोंदवली गेली असून ती सुमारे 50 दशलक्ष हेक्टरपर्यंत पोहोचली आहे.
Published on: 23 October 2023, 12:38 IST