Government Schemes

मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना खतांसाठी अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना उत्पादन मूल्याच्या किमती एवढे खतासाठी पैसे खर्च करणे शक्य नव्हते.

Updated on 11 April, 2022 2:51 PM IST

सध्या महागाईचा सर्वांनाच आर्थिक फटका बसत आहे. शेतीमध्ये लागवडीसाठी लागणारे बियाणे (Seeds) व खते (Fertilizer) यांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महागाईचा चटका सहन करावा लागत आहे. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

आता शेतकऱ्यांना खतांसाठी अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना उत्पादन मूल्याच्या किमती एवढे खतासाठी पैसे खर्च करणे शक्य नव्हते. हेच कारण लक्षात घेता खते विभागाद्वारे 2016 मध्ये थेट लाभ हस्तांतरणाचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला होता. तर या प्रकल्पाचा हा हेतू आहे की, शेतकऱ्यांना खते खरेदी करताना आर्थिक मदत मिळावी.असा यामागच्या उद्देश आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खत अनुदान (Fertilizer Subsidy) देऊन खतांच्या दरांमध्ये घट करत आहे. आता सरकारने शेतकऱ्यांसाठी 'डीबीटी खत' अनुदान योजना आणली आहे. यामध्ये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खते खरेदी केल्यानंतर 100 टक्के रक्कम देण्यात येईल. त्यासह ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करता येईल. छोट्या दुकानात देखील पीओएस किंवा पॉईंट ऑफ सेल्स उपकरणे बसवण्यात येणार आहेत.

तसेच खत विक्रीचे प्रमाण, खत विकत घेतलेल्या शेतकऱ्याची माहिती आणि भरलेल्या रकमेची नोंद ही ऑनलाईन पद्धतीने सेव्ह केली जाईल. ही सर्व माहिती डिजिटल माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचेल. या सर्व आकडा लक्षात घेता सरकार अनुदानाची रक्कम कंपनीकडे पाठवेल. असे या योजनेचे स्वरूप आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचा आर्थिक ताळमेळ बसणार आहे.

fert.nic.in पोर्टलवर लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. तर सबसिडी मिळवण्यासाठी पीएम किसान सन्मान निधीसाठी नोंदणी केलेल्या तपशील नोंदणीच्या वेळी संदर्भित केला जाईल. यामुळे लवकरात लवकर ही योजना सुरु होऊन शेतकऱ्यांना कधी पैसे मिळणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
रात्रीच्या भारनियमन रद्द करा, शेतकऱ्यांचा वीज बिल न भरण्याचा इशारा
अजित पवारांनी निर्णय घेतला आणि यंत्रणा लागली कामाला, अतिरिक्त ऊस तोडायला हार्वेस्टर रवाना..
चालत्या-फिरत्या पेट्रोल पंपामुळे शेतकऱ्यांना फायदा, घरपोच मिळतय पेट्रोल..

English Summary: farmers will get 100% direct subsidy for fertilizers, big decision of Modi government ..
Published on: 11 April 2022, 02:51 IST