सध्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देताना बँका अनेकदा आडकाठी आणतात. यामुळे शेतकरी अडचणीत येतो. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या सीबीलचा (CIBIL Score) विषय आज अधिवेशनात मांडण्यात आला.
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही त्याबाबत राज्य पातळीवरच्या समितीसमोर हा मुद्दा उपस्थित केला. त्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) (RBI) स्पष्ट निर्देश दिले आहेत.
तसेच ते म्हणाले, कोणत्याही राष्ट्रीयकृत आणि शेतकऱ्यांसाठी सीबीलचा मुद्दा उपस्थित करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याबाबत तक्रारी केल्या तर कारवाई करू, असेही ते म्हणाले.
कारखाना वाचवण्यासाठी कायपण! शेतकऱ्याने लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र
सोयापेंडच्या बाबतही गेल्यावर्षी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. यंदाही तसेच पत्र केंद्राला लिहिले आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. सोयापेंडेच्या आयातीचा थेट परिणाम सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर होत असतो. म्हणून त्याबाबत केंद्राला निर्णय घ्यायला लावू, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
जनावरांसाठी सक्षम विमा योजना लवकरच मिळणार, राज्यात २८ हजार जनावरे मृत्युमुखी
दरम्यान, आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकाना इशारा दिला. असे असले तरी बँका खरच शेतकऱ्यांना त्यांच्या दारात उभा करणार का असा प्रश्न आहेतच, अनेकदा नियम एका बाजूला आणि वास्तव एका बाजूला असते.
महत्वाच्या बातम्या;
'ऊसतोडणी मुकादमांवर नियंत्रण ठेवून साखर कारखाने आणि वाहतूकदारांची लुबाडणूक थांबवा'
कोल्हापूर, सांगली पाण्यात जाणार? कर्नाटककडून अलमट्टी धरणााची उंची वाढवण्याच्या हालचाली...
सह्याद्रीचे शेतकरी जगात भारी! कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केले नाशिकच्या शेतकऱ्यांचे कौतुक
Published on: 30 December 2022, 09:45 IST