Government Schemes

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई माहिती भरू शकतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो. मात्र पीक विम्याची माहिती भरताना शेतकऱ्यांना काळजी घेणे गरजेचे असते.

Updated on 27 October, 2022 3:55 PM IST

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी पीक विमा (crop damage) योजनेतून नुकसान भरपाई माहिती भरू शकतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो. मात्र पीक विम्याची माहिती भरताना शेतकऱ्यांना काळजी घेणे गरजेचे असते.

नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना शेतकऱ्यांनी काही बाबी विचारात घ्याव्या, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी (farmers) सोयाबीन, मका व ज्वारी या पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना काढणीपश्चात नुकसान 'या' जोखिमेच्या बाबीअंतर्गत तक्रार दाखल करावी.

'या' सहा राशींवर असणार एक महिन्यापर्यंत सूर्यग्रहणाचा प्रभाव; कसे कराल रक्षण? जाणून घ्या

या महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्या

१) Standing Crop Harvested व Cut & Spread Bundled For Drying असे पर्याय दिलेले असून, त्यापैकी Cut & Spread / Bundled For Drying हा पर्याय निवडा.

२) नुकसानीची टक्केवारी शंभर टक्के नमूद करा.

३) कापूस व तूर या पिकांचे नुकसान झाल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेच्या बाबीअंतर्गत तक्रार दाखल करा.

४) पिकाची स्थिती (Status Of Crop At The Time Of Incidence) Standing Crop हा पर्याय निवडा. 

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मिळणार महत्वाची सुविधा

५) नुकसानीची टक्केवारी ही प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात नमूद करा.

६) प्रत्येक गटातील प्रत्येक पिकांसाठी स्वतंत्रपणे तक्रार दाखल करा.

७) तक्रार दाखल झाल्यानंतर प्रत्येक तक्रारीसाठी स्वतंत्र तक्रार क्रमांक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर येईल.

८) सदरील तक्रार क्रमांक जतन करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 
दिलासादायक! 'या' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन
आता दुधाचे उत्पादन होणार दुप्पट; 'या' जिल्ह्यात राबविण्यात येणार आनंद पॅटर्न प्रकल्प
सावधान! पुढील दोन दिवस 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

English Summary: Farmers take care things while filling information crop damage
Published on: 27 October 2022, 03:51 IST