Government Schemes

शेतकरी रब्बी हंगामात अनेक पिकांची काळजी घेतात. ज्यामधून चांगले उत्पादन मिळते. मात्र काही भाग कोरडवाहू असल्यामुळे शेतकरी अनेक पिकांची लागवड करण्यास टाळतात. ही समस्या कशी टाळता येईल याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Updated on 28 September, 2022 2:01 PM IST

शेतकरी रब्बी हंगामात अनेक पिकांची काळजी घेतात. ज्यामधून चांगले उत्पादन मिळते. मात्र काही भाग कोरडवाहू असल्यामुळे शेतकरी अनेक पिकांची लागवड (crop cultivation) करण्यास टाळतात. ही समस्या कशी टाळता येईल याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

शेतामध्ये (agriculture) नवनवीन तंत्र आले. मात्र काही भाग सोयी-सुविधा असूनही सुधारले नाहीत. याचे कारण म्हणजे रब्बी हंगामातील कोरडवाहू क्षेत्र. याठिकाणी पाहिजे तसे पिकांचे उत्पादन मिळत नाही. विशेष म्हणजे आजही शेतकरी रब्बी हंगामातील पिकांची लागवड पारंपरिक पद्धतीने करतात.

रब्बी हंगामातील कोरडवाहू क्षेत्रात घेतली जाणारी पिके आणि आधुनिक तंत्र अवलंबल्यास या पिकांचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी चांगली मदत होऊ शकते. याविषयी पाहूया...

मिथुन आणि तूळ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार आनंदाचा काळ; वाचा आजचे राशीभविष्य

या भागात घेतली जाणारी महत्वाची पिके

विदर्भ व मराठवाडा या भागात ज्या जमिनीची जलधारणा शक्ती (water holding power) अधिक आहे अशा ठिकाणी रबी हंगामाची पिके घेतली जातात. यामध्ये प्रामुख्याने रबी ज्वारी, करडई, हरभरा ही पिके येतात.

सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक व धुळे यांचा पूर्व भाग व जळगाव, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद हा विभाग अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या भागात पाऊस ४०० ते ७५० मि.मी. जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान पडतो. या विभागात ७० टक्के क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिके घेतली जातात.

Tur Market Price: 'या' बाजार समितीत तुरीला मिळतोय सर्वाधिक भाव; जाणून घ्या दर

याठिकाणी प्रामुख्याने रब्बी ज्वारीचे पीक घेतल्या जाते. त्याचबरोबर करडई आणि हरभरा ही पिके काही अंशी घेतले जातात. खरिपातील संकरित ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांमधील तणांचा बंदोबस्त योग्य वेळी केल्यास जमिनीमध्ये दीर्घकाळ ओलावा टिकून राहून रब्बी हंगामातील दुबार पिकाचे उत्पादन अधिक मिळते.

रब्बी हंगामातील महत्वाच्या पिकांची (crops) शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करतांना यामध्ये मृद व जलसंधारण, पिकांच्या सुधारित जातींची निवड (Selection improved varieties crops), वेळेवर मशागत व पेरणी, तणांचा बंदोबस्त, रासायनिक खतांचा समतोल वापर, गरजेनुसार पीक संरक्षण, ओलावा टिकविणे, आपत्कालीन पीक योजना व सुयोग्य व्यवस्थापन या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

महत्वाच्या बातम्या 
दिलासादायक! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक कर्जाची रक्कम जमा; 728 कोटी रुपयांहून कर्ज वाटप
आनंदाची बातमी! 'या' दोन बँका FD वरील व्याजदर वाढवणार; गुंतवणूकदारांना मिळणार भरपूर लाभ
शेतकरी मित्रांनो 'या' तारखेपासून भुईमुगाची पेरणी करा; मिळेल भरघोस उत्पादन

English Summary: Farmers should plant dryland areas Crops come full force
Published on: 28 September 2022, 01:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)