Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. यामधीलच सर्वात महत्वाची योजना म्हणजे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना.

Updated on 21 October, 2022 1:14 PM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी (farmers) नवनवीन योजना राबवत असतात. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. यामधीलच सर्वात महत्वाची योजना म्हणजे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना.

या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान (Subsidy to farmers) दिले जाते. या योजनेबाबत सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना 200 कोटींचे अनुदान (200 crores grant) दिले जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील पात्र शेतकरी 55 हजार आहेत. या शेतकऱ्यांना 200 कोटींचे अनुदान काल गुरुवारी खात्यात जमा करण्यात आले आहे.

आनंदाची बातमी! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 718 कोटी मदत देण्यास सुरुवात

शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यामुळे त्यांची दिवाळी गोड झाली आहे. मात्र जिल्ह्यातील अजूनही 1 लाख नियमित कर्जदार शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यांना दिवाळीनंतर लाभ मिळण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने (State Govt) नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन (encourage) अनुदान जमा करण्याची प्रक्रिया गुरुवारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 55 हजार शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान बँक खात्यावर जमा झाले. त्यामध्ये जिल्हा बँकेकडील 51 हजार शेतकऱ्यांची तब्बल 185 कोटी रुपयांच्या रकमेचा समावेश आहे. उर्वरित राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकाकडील शेतकऱ्यांची रक्कम सुमारे 15 कोटी आहे.

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! सरकार दिवाळीला स्वस्त दराने डाळींची विक्री करणार

या शेतकऱ्यांचा आठवड्यात होणार निर्णय

पहिल्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या मात्र आधार प्रमाणीकरण न झालेले एक हजार 261 व तक्रारी असलेल्या 455 शेतकऱ्यांचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच या शेतकऱ्यांना शासनाच्या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या 
कांद्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते? जाणून घ्या अहवाल
परतीच्या पावसाचा धुमाकूळ; सोयाबीन, भुईमूग, कांदा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; या जिल्ह्यात लम्पीने 10 जनावरांचा मृत्यू तर 110 जनावरे बाधित

English Summary: farmers occasion Diwali Incentive grant 200 crores 55 thousand farmers
Published on: 21 October 2022, 01:07 IST