Government Schemes

भविष्यात तडजोड करावी लागू नये, यासाठी आतापासून गुंतवणूक (investment) करणे गरजेचे असते. तुम्हाला दीर्घ मुदतीमध्ये खात्रीशीर परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुमची सुरक्षित गुंतवणूक राहते.

Updated on 24 August, 2022 1:47 PM IST

भविष्यात तडजोड करावी लागू नये, यासाठी आतापासून गुंतवणूक (investment) करणे गरजेचे असते. तुम्हाला दीर्घ मुदतीमध्ये खात्रीशीर परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुमची सुरक्षित गुंतवणूक राहते.

किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) या लोकप्रिय योजनेमध्ये तुम्ही वार्षिक 6.9 टक्के चक्रवाढ व्याजाचा लाभ घेऊ शकता. किसान विकास पत्र (KVP) ही योजना प्रचलित व्याजदराने 10 वर्षे आणि 4 महिन्यांत तुमची ठेव रक्कम दुप्पट करू शकते.

तुम्ही 1 लाख रुपये किसान विकास पत्र ठेव सुरू केल्यास, पुढील 124 महिन्यांत ती 2 लाख रुपये होईल. किसान विकास पत्र ठेवींवरील सध्याचा 6.9% व्याजदर अनेक बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त आहे.

Garlic Farming: लसूण शेतीमधून 6 महिन्यांत तब्बल 10 लाखांपर्यंत मिळणार नफा; फक्त 'या' गोष्टींची काळजी घ्या

तुम्ही किसान विकास पत्र मध्ये किमान रु 1000 आणि नंतर रु 100 च्या पटीत जमा करू शकता. या योजनेअंतर्गत (Under this scheme) गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. तुम्ही कितीही किसान विकास पत्र खाती उघडू शकता.

Sanen Goat: सानेन शेळीच्या पालनाने शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; फक्त 'ही' काळजी घ्या

या योजना देखील उपयोगी

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund), सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना या सारख्या अनेक पोस्ट ऑफिस योजना (Post Office Scheme) बँकांच्या मुदत ठेवींच्या तुलनेत जास्त व्याज दर आणि कर लाभ देतात. तुम्हाला जोखीम घेण्याची भीती वाटत नसेल, तर तुम्ही म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.

महत्वाच्या बातम्या 
Red Kandhari: पशूपालकांचे दूध उत्पन्न वाढणार; 'लाल कंधारी' गाय 275 दिवस देते दूध
Soybean Market Price : सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाची बातमी; सोयाबीन विकला जातोय 'या' दराने
Sanen Goat: जास्त दूध उत्पादनासाठी सानेन शेळी ठरतेय अव्वल; पालनातून शेतकऱ्यांना मिळणार चांगले उत्पादन

English Summary: Farmers money double through Kisan Vikas Patra Yojana
Published on: 24 August 2022, 01:39 IST