Government Schemes

सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवत असते. पुणे जिल्हा परिषद आणि कृषी विभाग अंतर्गत नैसर्गिक सेंद्रिय शेतीला (Organic farming) प्रोत्साहन देण्यासाठी योजना आणली जात आहे.

Updated on 18 August, 2022 2:12 PM IST

सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवत असते. पुणे जिल्हा परिषद आणि कृषी विभाग अंतर्गत नैसर्गिक सेंद्रिय शेतीला (Organic farming) प्रोत्साहन देण्यासाठी योजना आणली जात आहे.

शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 200 लिटरचा सोलर वॉटर हीटर (Solar water heater) सयंत्र बसवण्यासाठी सुद्धा अनुदान दिले जाते. शिवाय शारदा शेतकरी माता भगिनी योजना देखील पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून अमलात आणली जात आहे. या योजनेविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.

1) नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजना

पुणे जिल्हा परिषद पुणे कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमान राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत गिरगाय, शेतकरी प्रशिक्षण, गांडूळ खत निर्मिती, जैविक खत किंवा कीटकनाशक, बायोमेडिक खत युनिट (Biomedical Fertilizer Unit), सेंद्रिय शेती याकरिता एकत्रित मानधन 65 हजार रुपये मिळते. या योजनेत सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत हे 22 ऑगस्ट 2022 इतकी आहे.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी (farmers) सेंद्रिय शेती करण्यास तयार असल्याबाबत प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थ्यांनी स्वतःच्या शेतावर कंपोस्टिंग, सोनखत, जैविक खत, निंबोळी पेंड, जीवामृत, दशपर्णी अर्क इत्यादी जैविक बाबींचा अवलंबन करणे अपेक्षित आहे. या योजनेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

अर्जासोबत कागदपत्रे

1) सातबारा किंवा आठ अ दाखला
2) आधार कार्डची झेरॉक्स
3) बँक पासबुक झेरॉक्स
4) किमान तीन एकर आणि कुटुंबाचे जास्तीत जास्त दहा एकर जमीन असावी.

Crop Management: कापूस आणि सोयाबीन पिकांतील तणनियंत्रण वेळीच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान

2) शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 200 लिटरचा सोलर वॉटर हीटर संयंत्र

या योजनेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. तुम्हाला अर्जासोबत सातबारा (satbara) किंवा आठ अ चा दाखला आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स धारण क्षेत्र जास्तीत जास्त दहा एकर पर्यंत असावे अशी अट देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदत 22 ऑगस्ट 2022 इतके आहे. या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करावे लागणार.

शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर सोलर वॉटर हीटर संयंत्र (Solar water heater plant) 200 लिटर क्षमता घेण्यासाठी अनुदान देण्यात येते. विहित तांत्रिक मापदंडाचे सोलर वॉटर हीटर सयंत्र 200 लिटर क्षमता खरेदी केल्यानंतर खरेदी समितीने निश्चित केलेल्या रकमेच्या 75 टक्के अनुदानास शेतकरी पात्र राहील खरेदी रोखीने किंवा कॅशलेस पद्धतीने व्यवहार करणे आवश्यक आहे.

MNRE/MEDA मान्यता प्राप्त उत्पादकांकडून सदरचे सोलर वॉटर हीटर सयंत्र खरेदी करणे बंधनकारक आहे. त्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास एकाच संयंत्रासाठी लाभ देण्यात येईल.

Modi Government: मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय; 'या' योजनेला दिली मंजूरी

3) शारदा शेतकरी माता भगिनी योजना

महिलांना स्वावलंबी बनवण्याकरिता ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विधवा घटस्फोटीत परितक्त्या निराधार महिलांसाठी पाच हजार रुपये मानधन देण्यात येते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी देखील अंतिम मुदत 22 ऑगस्ट 2022 ही आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात वास्तव्य व शेतजमीन (agriculture) असणाऱ्या विधवा शेतकरी महिला घटस्फोटीत शेतकरी महिला परी तक्त्यात शेतकरी महिला व निराधार शेतकरी महिला सहभाग घेऊ शकतात.

या योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (bank account) रक्कम रुपये 5000 मर्यादेत प्रोत्साहन पर अनुदान जमा करता येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी सातबारा किंवा आठ अ चा दाखला आधार कार्डचा स्वयंशाक्षांकित प्रत आवश्यक आहे.

कुठे अर्ज कराल

वरील योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायत पंचायत समिती कार्यालय व जिल्हा परिषद संकेतस्थळावर उपलब्ध आहेत व अर्ज भरून पंचायत समिती कार्यालयात जमा करायचे आहेत.

महत्वाच्या बातम्या 
Agriculture Cultivation: 'या' शेतीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मिळेल बंपर नफा; जाणून घ्या सविस्तर
आता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार; शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने घेतला 'हा' मोठा निर्णय
पीएम किसान योजनेबाबद महत्वाची बातमी; पती-पत्नीला लाभ मिळण्यासंदर्भात नवीन नियम लागू

English Summary: Farmers 65 thousand stipend scheme Deadline 22 August
Published on: 18 August 2022, 02:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)