Government Schemes

शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणार्या गरजेच्या वस्तू किंवा शेती व्यवसाय शेतकऱ्यांना सोपा व्हावा यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.

Updated on 05 May, 2022 9:15 PM IST

शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणार्‍या गरजेच्या वस्तू किंवा शेती व्यवसाय शेतकऱ्यांना सोपा व्हावा यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.

शेती म्हटले म्हणजे सिंचनाची व्यवस्था खूप महत्त्वाचे असते. बऱ्याचदा बोरवेल किंवा विहिरींना पाणी असते परंतु विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही. विजेचा लपंडाव हा तर पाचवीलाच पुजलेला असतो. यामध्ये महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली  आहे. या योजनेच्या माध्यमातून सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पंपांचे सौर पंप आत रूपांतर करून नवीन सौरपंप  बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनुदान दिले जात आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना च्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाख कृषिपंप देण्याचा निर्णय घेतला आहे. हे पंप तीन वर्षात शेतकऱ्यांना देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ज्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून सौर पंपाद्वारे सिंचनासाठी सौर पंप घ्यायचा असेल ते  शेतकरी या योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022 अंतर्गत महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचन करण्यासाठी सौर पंप उपलब्ध करून देणार असून या योजनेच्या अंतर्गत पंपाच्या किमतीच्या 95 टक्के अनुदान सरकार देते. लाभार्थ्यांना फक्त पाच टक्के रक्कम भरावी लागते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप मिळाल्याने पिकांना वेळेत पाणी उपलब्ध होईल व शेतकर्‍यांच्या उत्पन्नात देखील वाढ होणार असून त्यांना बाजारातून जास्त किमतीचे पंप खरेदी करावी लागणार नाहीत.

महत्वाच्या बातम्या                                                     

नक्की वाचा:खरं काय! वयाच्या 84 व्या वर्षी मनकर्णा आजीबाई शेतीतुन मिळवतात लाखोंच उत्पन्न; नवयुवकांना लाजवणारी 'तरुण' आजीची भन्नाट कथा

नक्की वाचा: हुई ना बात..! तरुण शेतकऱ्याने फक्त अडीच महिन्यात कमावले 10 लाख रुपये

नक्की वाचा:grape cultivation: शब्बास रे पठ्या..! एक एकरात घेतले तब्बल १२ लाखांचे उत्पन्न

English Summary: farmer get solar krushi pump through mukyamantri saur pump yojana
Published on: 05 May 2022, 09:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)