Government Schemes

सध्या वीज बिल जास्त येत असल्याने सर्वसामान्य लोकांचे खिसे रिकामे होत आहेत. यासह वीजपुरवठा खंडित केल्याने लोकांचे वेगळेच हाल होत असतात. अशा वेळी सर्वसामान्य लोकांनी व शेतकऱ्यांनी हरित उर्जेकडे वाटचाल करणे गरजेचे आहे.

Updated on 28 July, 2022 12:15 PM IST

सध्या वीज बिल जास्त येत असल्याने सर्वसामान्य लोकांचे खिसे रिकामे होत आहेत. यासह वीजपुरवठा खंडित केल्याने लोकांचे वेगळेच हाल होत असतात. अशा वेळी सर्वसामान्य लोकांनी व शेतकऱ्यांनी हरित उर्जेकडे वाटचाल करणे गरजेचे आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला वीज बिलापासून (electricity bill) सुटका हवी असल्यास तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवावे लागेल, यामध्ये सरकारही तुम्हाला मदत करेल. सौर पॅनल बसविण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते.

तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवून तुम्ही वीज गरजे इतकी निर्माण करू शकता. सौर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च लागतो आणि सरकार यावर किती सबसिडी देते. याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

सौर पॅनल बसवण्यासाठी आधी तुम्हाला किती विजेची गरज आहे आणि किती मोठा सौर पॅनल बसवावा लागेल हे शोधून काढावे लागेल. जर तुमचा दैनंदिन वीज वापर 6 ते 8 युनिट असेल तर त्यासाठी 2 kW चा सौर पॅनल बसवावा लागेल. यामध्ये तुम्हाला चार सौर पॅनल मिळतील, जे एकत्र ठेवावे लागतील.

हे ही वाचा 
Post Office: आता पोस्ट ऑफिसमध्ये होणार पीक विम्याची नोंदणी; शेतकऱ्यांना दिलासा

किती खर्च होणार आणि किती अनुदान मिळणार

2 किलोवॅट (2 kW) सौर पॅनेल बसवण्यासाठी सुमारे 1.2 लाख रुपये खर्च करावे लागतील, परंतु जर तुम्ही ते तुमच्या घरी बसवले तर सरकार त्यावर 40 टक्के सबसिडी देईल. म्हणजेच 2 किलोवॅटच्या सोलर पॅनेलसाठी तुम्हाला फक्त 72 हजार रुपये खर्च करावे लागतील. सौर पॅनेलचे सरासरी आयुष्य सुमारे 25 आहे, म्हणजेच एकदा पैसे खर्च करून, आपण 25 वर्षांपर्यंत वीज बिल वाचवू शकता.

हे ही वाचा 
Agriculture Officer: ...आणि कृषी अधिकारी लाच घेताना जाळ्यात अडकला; वाचा नेमकं काय झालं

सौर पॅनल बसवण्यासाठी अर्ज कसा करावा

सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी, भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे (Ministry of Energy) सौर रूफ टॉप योजना चालवली जात आहे. सौर पॅनेल स्थापित करण्यासाठी, सोलर रूफ टॉप स्कीमच्या अधिकृत वेबसाइटवर जा https://solarrooftop.gov.in/ आणि Apply for Solar Rooftop वर क्लिक करा.

यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, जिथे राज्यानुसार लिंक निवडा. त्यानंतर एक फॉर्म उघडेल, ज्यामध्ये तुमचे सर्व तपशील भरा. सौर पॅनेल बसवल्यानंतर ३० दिवसांच्या आत सरकारकडून अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.

महत्वाच्या बातम्या 
Crop Management: शेतकरी मित्रांनो; आडसाली उसाचे करा 'असे' व्यवस्थापन, मिळेल भरघोस उत्पन्न
Heavy Rain: सावधान! पुढील दोन दिवस मुसळधार पाऊसाचा इशारा; शेतकऱ्यांना बसू शकतो फटका
Gas cylinder free: सरकार 3 गॅस सिलिंडर मोफत देणार; पहा तुम्ही आहात का लाभार्थी

English Summary: Farmer Friends 24 hours free electricity installing solar panels government subsidy
Published on: 28 July 2022, 12:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)