Government Schemes

सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. यासह शेतकऱ्यांची कामे कशी सोप्पी होतील याकडे सुद्धा सरकारचे लक्ष असते. आता आणखी एक दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला आहे.

Updated on 22 September, 2022 4:48 PM IST

सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. यासह शेतकऱ्यांची कामे कशी सोप्पी होतील याकडे सुद्धा सरकारचे लक्ष असते. आता आणखी एक दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला आहे.

आपण पाहिले तर शेतकऱ्यांची शेत जमीन (Farm Land) असतानाही विक्रीबाबत शासनाचे नियम आहे. मध्यंतरी शासनाने (Government) केलेल्या नवीन नियमामुळे जमिन विक्री ( Sale of Land ) करणेही मुश्किल झाले होते. कारण बागायतीसाठी 20 आणि जिरायतीसाठी 40 अशी अट घालून देण्यात आली होती.

आता तुकडेबंदी-तुकडेजोड कायदा 1947 मध्ये बदल करुन जिरायतीसाठी 20 गुंठे आणि बागायतीसाठी 5 गुंठेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतजमिनीचे (land) व्यवहार करणे सोपे होणार आहे.

दिवसा झोपल्याने खरंच नुकसान होते का? वाचा आयुर्वेदातील महत्वाच्या गोष्टी...

जमीन खरेदी-विक्रीवरुन (Buying and selling) ग्रामीण भागात आजही वाद-विवाद हे सुरुच आहेत. असे असतानाच जिरायत जमीन ही 2 एक्करपेक्षा कमी असल्यास विकता येणार नाही तर बागायत जमीन ही 20 गुंठे म्हणजे 1 एका एकरापेक्षा कमी असली तर विकता येत नव्हती.

हेच नाही तर 2 एकराच्या गटातील 5 ते 6 गुंठे जमीन देखील विकता येत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. शेतातील वाटेवरुन आणि बांधावरुनही भांडण-तंटे ही वाढले होते.

शेतकऱ्यांनो पुढचे 2 दिवस पावसाचा जोर कायम; कापूस, तूर, भुईमूग पिकांची अशी घ्या काळजी

त्यामुळे नागरिकांच्या सूचना आणि हरकती ह्या राज्य शासनाकडे (state government) पाठवण्यात आल्या आहेत. नियमामध्ये बदलाचा प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर ऑक्टोंबर महिन्यात निर्णय होईल अशी माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 
पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग योजनेला केंद्र सरकारकडून 10 लाख रुपयांचे अनुदान जाहीर
भारतातील 5 टॉप देशी गायींचे करा पालन; एका गाईचे पालन केले तरी होईल भरपूर कमाई
आनंदाची बातमी; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ४८ लाख ४९ हजार रुपयांचा निधी वाटप

English Summary: farm land decision government farmers free worry
Published on: 22 September 2022, 04:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)