Government Schemes

ग्रामीण भागात ‘प्रधानमंत्री आवास योजना’ राबवली जात आहे. या योजने अंतर्गत केंद्र सरकार ग्रामीण भागातील कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी १ लाख ३० हजार रुपये इतके अनुदान देते. मात्र आता या योजनेबाबद केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Updated on 26 July, 2022 12:10 PM IST

ग्रामीण भागात ‘प्रधानमंत्री आवास योजना’ (Pradhan Mantri Awas Yojana) राबवली जाते. या योजने अंतर्गत केंद्र सरकार (Central Govt) ग्रामीण भागातील कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान देते. मात्र आता या योजनेबाबद एकनाथ शिंदेंनी मोठा निर्णय घेतला आहे.

सर्वांसाठी घरे या पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) सरकारच्या संकल्पनेच्या आधारे पनवेल महापालिका पहिल्या टप्प्यात बांधत असलेल्या सुमारे ७८९ घरांच्या बांधकामास एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde and Devendra Fadnavis) यांच्या द्विसदस्यीय मंत्रिमंडळाने स्थगिती दिली आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेने याबाबतच्या निविदांना तत्काळ स्थगिती दिल्याने शहरांतील गरिबांचे घरांचे स्वप्न लांबणीवर पडले आहे. पनवेल महापालिका तीन प्रकल्पात जवळपास ३,९०० घरांची निर्मिती करणार आहे.

हे ही वाचा 
Today Horoscope: 'या' ५ राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

यातील २,०६२ घरे झोपडपट्टीवासीयांना मिळणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला आणि तिसऱ्या टप्प्यात अशोक बाग, तक्का वसाहतीसह इंदिरा नगर या झोपडपट्टीमधील रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील निविदा १२० कोटींची यातील पहिल्या टप्प्यातील प्रकल्पासाठी १२०.३६ कोटी रुपयांची निविदा महापालिकेने काढली होती. परंतु, शिंदे सरकारच्या (Shinde Govt) निर्देशानुसार महापालिकेने तिला १९ जुलै २०२२ रोजी तत्काळ स्थगिती दिली.

पहिल्या टप्प्यात ७८९ घरांमध्ये झोपडपट्टीवासीयांसह १७४ अत्यल्प व १५० अल्प उत्पन्न गटातील शहरी गरजूंनाही घरे २०२२ ते २०२५ पर्यंत दिली जाणार होती. मात्र,त्यांचे घरांचे स्वप्न आता लांबणीवर पडले आहे.

हे ही वाचा 
Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठे बदल; जाणून घ्या आजचे नवीन दर

पनवेलचीही निवड

पनवेल शहराची २००१ ची लोकसंख्या १ लाख ४ हजार होती. २०११ पर्यंत ती ५ लाख ९ हजार ९०१ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी ८ हजार ९७० इतकी कुटुंबे म्हणजेच ४४ हजार ८५० इतकी लोकसंख्या झोपडपट्टीत राहते.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणेच पनवेल महापालिकेचीही निवड झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 
Farmer Scheme: शेतकऱ्यांसाठी मनसे मैदानात, केली मोठी घोषणा..
Planting vegetables! शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात करा 'या' भाज्यांची लागवड; मिळेल भरघोस उत्पन्न
Fertilizer news; शेतकऱ्यांनो सावधान! खतामध्ये केली चक्क मिठाची भेसळ, चोरांनो कुठं फेडचाल हे पाप..

English Summary: Eknath Shinde canceled Modis decision Housing scheme suspended
Published on: 26 July 2022, 12:10 IST