Government Schemes

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत असतं. ज्यातून शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. परंतु या योजनेचा लाभ घेताना काळजी घेणे तितकेच गरजेचे असते.

Updated on 20 July, 2022 10:25 AM IST

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत असतं. ज्यातून शेतकऱ्यांना (farmers) लाभ घेता येतो. परंतु या योजनेचा लाभ घेताना काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. केंद्र सरकारने (central government) शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना आणली आहे.

पीएम किसान योजनेमुळे (pm kisan scheme) अनेक शेतकऱ्यांचा फायदा झाला. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकार वर्षभरात ६ हजार रुपये देते. मात्र या योजनेचा लाभ घेताना जर चुकीची माहीती दिली तर शेतकऱ्यांना (farmers) आणखी फटका बसू शकतो. तसेच तुम्हाला शिक्षाही भोगावी लागू शकते. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

शेतकरी मित्रांनो: 'या' पिकांची अशी घ्या काळजी; मिळणार भक्कळ पैसा

नियम व अटी 

कुटुंबातील लाभार्थी शेतकऱ्याचा (farmers) मृत्यू झाला असल्यास, तहसील अधिकारी व संबंधित बँकेकडे मृत्यू पुरावा सादर करून योजनेतून माघार घ्यावी.

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अपात्रतेचे निकष, संस्थाच्या मालकांच्या ज्या शेतकऱ्यांकडे सरकारी शेत, कोणत्याही ट्रस्टची शेती किंवा सहकारी शेती (agriculture) असेल ते या योजनेसाठी अपात्र ठरतात.

ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांमधील कोणत्याही व्यक्तीकडे पूर्वी किंवा सध्या एखादं घटनात्मक पद असेल, अशा व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहेत.

तसेच आमदार व खासदारही या योजनेच्या कक्षेत येत नाहीत. राज्यातील विधान परिषदांच्या सदस्यांची कुटुंबं, शहर प्राधिकरणाचे माजी आणि वर्तमान महापौर आणि जिल्हा पंचायतींचे माजी आणि सध्याचे अध्यक्ष या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाहीत.

माजी आणि सध्याचे केंद्र किंवा राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी व कर्मचारी या योजनेत अर्ज करू शकत नाहीत.

केंद्र किंवा राज्याच्या सार्वजनिक योजना आणि संबंधित कार्यालयांच्या किंवा केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या स्वायत्त संस्थांचे विद्यमान किंवा माजी अधिकारी यासाठी अपात्र आहेत.

'या' योजनेचा लाभ घेताना चुकीची माहिती देऊ नका; अन्यथा बसेल मोठा फटका

स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियमित कर्मचारी. अर्थात मल्टी टास्किंग स्टाफ, चतुर्थ श्रेणी किंवा ड वर्गातील कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत.

ज्यांना दरमहा 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन मिळते असे पेन्शनधारक पात्र नाहीत. गेल्या वर्षी ज्यांनी आयकर भरला आहे ते या योजनेत अर्ज करू शकत नाहीत.

त्याचप्रमाणे इंजिनीअर, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटट आणि आर्किटेक्ट व अन्य व्यावसायिक संस्थांशी जोडल्या गेलेल्या नोंदणीकृत व्यक्तीही या योजनेसाठी अपात्र आहेत.

बाईक खरेदी करताय? तर नितीन गडकरींची ही मोठी घोषणा पहाच; होईल मोठा फायदा...

English Summary: Do not give false information while availing scheme
Published on: 20 July 2022, 09:44 IST