Government Schemes

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजनांची अमलबजावणी करत असते. त्यापैकी शेतकऱ्यांची सर्वात जास्त पसंत असलेली योजना म्हणजे पीएम किसान योजना.

Updated on 22 July, 2022 4:03 PM IST

केंद्र सरकार (Central Govt) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजनांची अमलबजावणी करत असते. त्यापैकी शेतकऱ्यांची सर्वात जास्त पसंत असलेली योजना म्हणजे पीएम किसान योजना. चालू आर्थिक वर्षात पीएम किसान योजनेतील (PM Kisan Yojana) १० कोटी पात्र शेतकऱ्यांना २१ हजार ९२४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. 

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी दिली आहे. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेतील एकूण निधीपैकी ५०६३.२५ कोटी रुपयांचा निधी उत्तर प्रदेशात वितरीत करण्यात आला. २०५३ कोटी रुपये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले. अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे.

वातावरणामुळे ऊस पिकाचे नुकसान; तर त्वरित उसावरील पाकोळी किडीचे करा व्यवस्थापन

२०२०-२०२१ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेच्या माध्यमातून ९ कोटीहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत ५५,१०१ कोटी रुपयांचा निधी जमा केला होता. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात १०.६४ कोटी पात्र शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून ६६,४८३ कोटींची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

पीएम किसान योजनेचे संकेतस्थळ सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन यंत्रणा (PFMS), युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI), आयकर विभागाचे संकेतस्थळ, निवृत्तीवेतन व कर्मचारी नोंदणी कार्यालयाशी जोडण्यात आले असून त्याद्वारे योजनेतील लाभार्थ्याची पात्रता पडताळण्यात येते.

धक्कादायक ! 'या' योजनेच्या 9 हजार मृत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (PM Kisan) अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करते. ही मदत तीन समान हप्त्यात संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात येते. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.

महत्वाच्या बातम्या 
क्या बात है! अपंग पेन्शन योजनेचे ऑनलाइन अर्ज सुरू; इतकी मिळतेय पेन्शन
काय सांगता ! कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त? वाचा..
मोठी बातमी ; पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता येणार 'या' तारखेला

English Summary: Distribution 21 thousand crore rupees farmers
Published on: 22 July 2022, 03:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)